शासनाचा दूध खरेदी आदेश फाडला

शासनाचा दूध खरेदी आदेश फाडला
शासनाचा दूध खरेदी आदेश फाडला

कोल्हापूर : शासनाने काढलेल्या दूध खरेदी दराच्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. तसेच जे दूध संघ ग्राहक, उत्पादकांना लुटण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर शासनाकडून काहीच कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ, शुक्रवारी (ता. ११) जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी सी. के. कांबळे यांच्या समोर शासनाचा आदेश फाडून कॉँग्रेसच्या शिष्टमंडळाने निषेध व्यक्‍त केला.  शेतकरी आंदोलनानंतर राज्य शासनाने दूध खरेदी दरात ३ रुपयांची वाढ केली. काही दिवस दूध संघांनी हे वाढीव दरही दिले. मात्र अतिरिक्‍त दुधाचे कारण पुढे करत ही दरवाढ संघांनी मागे घेतली. शासनाचे आदेश डावलून ही दरवाढ मागे घेणाऱ्या संघांवर कारवाई करणे आवश्‍यक असताना चालढकल केली जात असल्याचा आरोप करत कॉँग्रेस शिष्टमंडळाचे संजय पाटील यांनी कांबळे यांना चांगलेच धारेवर धरले. दूध खरेदीबाबतचा आदेश डावलल्याबद्दल का कारवाई केली नाही, अतिरिक्‍त दूध आहे म्हणून खरेदी दर कमी केला जातो, तर मग ग्राहकाला कमी दराने का विक्री होत नाही, शासनाने अशा संघांवर प्रशासक नेमण्याच्या नोटिसा दिल्या होत्या, त्याची अंमलबजावणी का झाली नाही, सरकारच्या आदेशाप्रमाणे दूध संघाने दर द्यावेत, यासाठी तुम्ही किती वेळा प्रयत्न केला, आदी प्रश्‍नांचा भडिमार या वेळी करण्यात आला. शिष्टमंडळात जिल्हा परिषद सदस्य बजरंग पाटील, करवीर पंचायत समितीचे सभापती प्रदीप झांबरे, बजरंग रणदिवे, योगेश हत्तलगे, तानाजी मोरे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com