agriculture news in marathi, Congress to Campain JanAkrosh Andolan from 31 oct, Ashok Chavan | Agrowon

सरकारची तीन वर्षांतील कामगिरी निराशाजनक
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

मुंबई : गेल्या तीन वर्षांत सरकारची कामगिरी अत्यंत निराशाजनक आहे. फसवी शेतकरी कर्जमाफी, वाढत्या शेतकरी आत्महत्या, यवतमाळ शेतकरी दुर्घटनेप्रकरणी सरकारची असंवेदनशीलता वाढल्याचे उघड झाले आहे. या सर्वांविरोधात ३१ अॉक्टोबरपासून जनआक्रोश आंदोलन उभारण्यात येईल. नगर जिल्ह्यातून आंदोलनाची सुरवात होऊन समारोप नागपूर आधिवेशनात करण्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी (ता. २६) पत्रकार परिषदेत केली.

मुंबई : गेल्या तीन वर्षांत सरकारची कामगिरी अत्यंत निराशाजनक आहे. फसवी शेतकरी कर्जमाफी, वाढत्या शेतकरी आत्महत्या, यवतमाळ शेतकरी दुर्घटनेप्रकरणी सरकारची असंवेदनशीलता वाढल्याचे उघड झाले आहे. या सर्वांविरोधात ३१ अॉक्टोबरपासून जनआक्रोश आंदोलन उभारण्यात येईल. नगर जिल्ह्यातून आंदोलनाची सुरवात होऊन समारोप नागपूर आधिवेशनात करण्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी (ता. २६) पत्रकार परिषदेत केली.

जनआक्रोश आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी कॉँग्रेस प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रवक्ते सचिन सावंत या वेळी उपस्थित होते. 
 चव्हाण म्हणाले, ‘‘नोटाबंदीमुळे लोकांना त्रास झाला, देशाचे मोठे नुकसान झाले आहे. या निर्णयाला ८ नोव्हेंबरला वर्ष पूर्ण होत आहे, त्या दिवशी काळा दिवस पाळून सांगलीत विराट जाहीर सभेने जनआक्रोश आंदोलन पार पडेल. आंदोलन उभारून काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणार असल्याचे त्यांनी सांगितले.’’

‘‘कर्जमाफी म्हणजे आकड्यांचा फसवा खेळ होता. शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नाही. सरकारने अटी शर्ती घालून शेतकऱ्यांना कर्जमाफीतून वगळले. राज्याभर कर्जमाफीचा सावळा गोंधळ सुरू आहे.’’

कापूस खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणीच्या सक्तीची अट तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांना इतिहासात कधी नव्हे एवढी अपमानास्पद वागणूक या सरकारने दिली, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. रोज नवे जीआर काढून नियम बदलले, तारीख पे तारीख असे सरकारचे काम चालले आहे. सरकारमध्ये बसलेल्या लोकांना सरकार कसे चालवायचे ते माहीत नाही. यांनी सत्तेतून पायउतार व्हावे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात १८९ मंडळात जोरदार पाउस औरंगाबाद : मराठवाड्यातील 421 महसुल मंडळांपैकी तब्...
हिंगोली जिल्ह्यात सोळा मंडळात अतिवृष्टीहिंगोली : जिल्ह्यात मागील चोवीस तासांमध्ये दोन...
परभणीतील २४ मंडळात अतिवृष्टी नदी, नाले...परभणी : जिल्ह्यात बुधवार पासून पावसाचे...
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनादेड : जिल्ह्यातील माहूर, किनवट, भोकर, हिमायतनगर...
कोयनेत पूरस्थिती शक्‍यपाटण, जि. सातारा : कोयना धरण पाणलोट...
कर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का ?सातारा - ‘‘सोसायटीचे एक लाख ३० हजार रुपयांचे...
यवतमाळ जिल्ह्यात पूर परिस्थिती यवतमाळ  : जिल्हयात सुरु असलेल्या संततधार...
राज्यात भेंडी ५०० ते ३००० रुपये...सांगलीत दहा किलोस २५० ते ३०० रुपये  सांगली...
राज्याचा पुरोगामित्वाचा वारसा जपूया :...मुंबई: शेती, पाणी, गुंतवणूक, गृहनिर्माण अशा विविध...
विदर्भात पावसाचे जोरदार कमबॅकनागपूर ः गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या...
शिराळ्यात नागप्रतिमेची पूजाशिराळा, जि. सांगली ः  अनेक वर्षे जिवंत...
अकोल्यात पावसाचे आगमनअकोला : या भागात गेल्या २० पेक्षा अधिक...
एकात्मिक कीड नियंत्रणात फेरोमोन...कामगंध सापळ्यांचा वापर केल्यास कमी खर्चात कीड...
उत्पादनवाढीसाठी एअरोसोल्सद्वारे...पृथ्वीच्या वातावरणामध्ये कृत्रिमरीत्या सल्फेट...
राजकीय सभ्यता व सुसंस्कृतपणा जपणारा एक...पुणे : राजकिय विरोध कितीही असला तरी राजकारणातील...
अटलजी : एका उत्तुंग नेतृत्वाचा अस्तभारताचे माजी पंतप्रधान, देशाचे लोकप्रिय नेते...
देशाने महान पुत्र गमावला : राहुल गांधी नवी दिल्ली : ''आज भारताने महान पुत्र गमावला...
वाजपेयींच्या निधनाने एका युगाचा अंत :...नवी दिल्ली : ''अटलजींच्या निधनाने एका युगाचा...
अजातशत्रू, मुरब्बी राजकारणी : अटल...शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे,...
...या आजारांनी वाजपेयींना ग्रासले होतेनवी दिल्लीः माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...