नाट्यमय घडामोडीत काॅँग्रेसने चंद्रपूरचा बदलला उमेदवार

नाट्यमय घडामोडीत काॅँग्रेसने चंद्रपूरचा बदलला उमेदवार
नाट्यमय घडामोडीत काॅँग्रेसने चंद्रपूरचा बदलला उमेदवार

चंद्रपूर  ः विनायक बांगडे यांच्या उमेदवारीला जिल्हाभरातून झालेला विरोध. पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याच्या इशाऱ्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडीत अखेरीस बांगडे यांच्याऐवजी बाळू धानोरकर यांना काॅँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली.  वरोरा-भद्रावती मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर लोकसभेच्या उमेदवारीकरिता काॅँग्रेसच्या संपर्कात होते. भाजपने शिवसेना आणि नेतृत्वाचा सातत्याने अपमान केल्याचा आरोप करीत त्यांनी आमदारकी आणि पक्ष सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला. काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेत त्यांनी काॅँग्रेस प्रवेशाची तयारी केली. मात्र, त्यांच्या उमेदवारीला जिल्ह्यातील काॅँग्रेसच्या एक गटाकडून विरोध झाला. त्यामुळे त्यांचा पक्ष प्रवेशही रखडला. याचवेळी काॅँग्रेसच्या एका गटातून काटोलचे आमदार आशिष देशमुख यांच्यासाठी लॉबिंग सुरू झाली. त्यांचे नाव मागे पडल्यानंतर विलास मुत्तेमवार यांचा मुलगा विशाल मुत्तेमवार यांच्या उमेदवारीची चर्चा झाली. जिल्ह्यातील सर्वच गटाच्या नेत्यांनी विशाल मुत्तेमवार यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने अखेरीस त्यांनीच माघार घेतली. दरम्यान, काॅँग्रेसने ऐनवेळी विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर बांगडे यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात काॅँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचीही नाराजी पुढे आली. माध्यमांमध्ये चंद्रपूरच्या उमेदवारीवरून चव्हाण राजीनामा देत असल्याची चर्चा सुरू झाली. या साऱ्या नाट्यमय घडामोडीनंतर काही नेते दिल्लीत धानोरकर यांच्या उमेदवारीसाठी ठाण मांडून होते. शिवाजीराव मोघे, आमदार विजय वडेट्टीवार आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण देखील दिल्लीत पोचले. त्यानंतर उशिरा विनायक बांगडे यांना बदलून बाळू धानोरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com