agriculture news in marathi, congress committee mitting, mumbai, maharashtra | Agrowon

नेता निवडीचा अधिकार राहुल गांधींना
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 मे 2019

मुंबई  ः काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ नेता निवडण्याचा अधिकार अपेक्षेप्रमाणे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना देण्यात आला आहे. तसा एक ओळीचा ठराव सोमवारी (ता. २०) काँग्रेस आमदारांच्या बैठकीत करण्यात आला. त्यामुळे आता नेतेपदी कुणाची वर्णी लागते, याची उत्सुकता वाढली आहे.

मुंबई  ः काँग्रेस पक्षाचा विधिमंडळ नेता निवडण्याचा अधिकार अपेक्षेप्रमाणे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना देण्यात आला आहे. तसा एक ओळीचा ठराव सोमवारी (ता. २०) काँग्रेस आमदारांच्या बैठकीत करण्यात आला. त्यामुळे आता नेतेपदी कुणाची वर्णी लागते, याची उत्सुकता वाढली आहे.

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याने नवा नेता निवडीसाठी सोमवारी विधान भवनात काँग्रेस आमदारांची बैठक झाली. बैठकीला प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, आशिष दुवा, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित होते. बैठकीत काँग्रेस विधिमंडळ पक्षासाठी नवा नेता निवडण्याचा अधिकार राहुल गांधी यांना देण्याचा ठराव आमदार विजय वडेट्टीवार यांनी मांडला. या ठरावाला आमदार नसीम खान, यशोमती ठाकूर, विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे विधिमंडळात काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या नावाची घोषणा दिल्लीतूनच केली होईल. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १७ जूनपासून मुंबईत सुरू होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे हे शेवटचे अधिवेशन आहे. या अधिवेशनापूर्वी काँग्रेसला नेता निवडावा लागणार आहे.

राष्ट्रवादी सोबतच्या आघाडीत नगर लोकसभेची जागा काँग्रेसला न सुटल्याने ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. विखे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या विरोधातील उमेदवारांचा प्रचार केला. त्यामुळे लोकसभेचे मतदान संपण्यापूर्वीच काँग्रेस श्रेष्ठींनी विखे यांना जबाबदारीतून मुक्त केले होते. विखे पाटील यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसवर नवा नेता निवडीची वेळ आली आहे. नेतेपदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि वर्षा गायकवाड यांच्या नावाची चर्चा आहे.

१० ते १२ आमदारांची बैठकीकडे पाठ 
दरम्यान, या बैठकीकडे १० ते १२ आमदारांनी पाठ फिरवली. राधाकृष्ण विखे-पाटील, अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर, नीतेश राणे हे आमदार बैठकीला फिरकले नाहीत. काही आमदारांनी आजारी असल्याचे कारण सांगून बैठकीला येण्याचे टाळले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे परदेशात असल्याने ते बैठकीला येऊ शकले नाहीत. बैठकीच्या निमित्ताने मल्लिकार्जुन खरगे यांनी आमदारांशी 'वन टू वन' चर्चा केली.

इतर ताज्या घडामोडी
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
बीबीएफ तंत्रज्ञानानेच पेरणी, विश्वी...बुलडाणा ः येत्या हंगामात बीबीएफ तंत्रज्ञानाने...
सांगली जिल्ह्यात १८३ गावांना टँकरने...सांगली : जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा संपला...
जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे...जळगाव  ः खानदेशात सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून...
आषाढी वारीत शासकीय महापूजेचा वेळ...सोलापूर : आषाढी एकादशी दिवशीची श्री विठ्ठल-रुक्‍...
जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुलावरून...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
वऱ्हाडात महाबीज बियाणे मिळण्यापूर्वी...अकोला ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम व ग्राम...
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात...सातारा  : टेंभू उपसा सिंचन योजनेतून खटाव...
मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात...मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९८...
पाऊस लांबल्याने आता कोणते पीक घ्यावे?...नगर : मॉन्सून लांबल्याने आता खरीप पिकांत बदल...