agriculture news in marathi, congress leaders meeting with intellectuals, jalgaon, maharashtra | Agrowon

आमचे सरकार आल्यास करप्रणालीत बदल करू : अशोक चव्हाण
टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

राज्यात सरकारचा पोलिस तसेच प्रशासकीय कामात मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप वाढला आहे. सर्वच ठिकाणी नागरिकांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न होत आहे. पोलिसांसह सर्वच अधिकाऱ्यांना आता भाजपचे पदाधिकारी म्हणून काम करण्यास भाग पाडले जात आहे.
- अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष

जळगाव  : वस्तू व सेवाकर (जीएसटी) लावण्याचा निर्णय आमच्या सरकारच्या कालावधीतच घेण्यात आला होता. मात्र या सरकारने तो आणला आणि चुकीच्या पद्धतीने लागू केला. परिणामी तो आता जाचक झाला आहे. आमचे सरकार आल्यास आम्ही निश्‍चित त्यात बदल करणार आहोत. ‘एक राष्ट्र, एक कर’ हेच आमचे धोरण राहणार आहे, अशी ग्वाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे दिली.

काँग्रेसच्या वतीने जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने जळगाव येथे ‘परामर्श बुद्धिवंताचा'' कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी (ता. ५) सकाळी करण्यात आले होते. या वेळी माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, रत्नाकर महाजन, प्रवक्ते सचिन सावंत, आमदार भाई जगताप, विनायक देशमुख, जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, उल्हास पाटील, सत्यजित तांबे आदी उपस्थित होते. यात शहरातील वैद्यकीय, बांधकाम, अकाउंटंट, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या वेळी श्री. चव्हाण म्हणाले, की राज्यात कायदे आहेत, परंतु त्याची अमंलबजावणी केली जात नाही. सत्ताधारी पक्षाचा राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रशासनाने सत्ताधारी पक्षाच्या विचारसरणीचा व्यक्ती मिळेपर्यंत जागा राखीव ठेवण्याचा प्रकार सुरू केला आहे. भाजप कार्यकर्ता म्हणूनच आज प्रशासनासह पोलिस विभागातील अधिकारी काम करीत आहे. राज्यातील ही परिस्थीती अतिशय गंभीर आहे. देश व राज्यातील सरकार समाजा-समाजात सामाजिक संघर्ष उभा करून त्या माध्यमातून आपली मतपेटी भरण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप श्री. चव्हाण यांनी केला. यानंतर जनसंघर्ष यात्रेनिमित्त काँग्रेस नेत्यांच्या जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, पारोळा व अमळनेरात सभा झाल्या.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...
नैसर्गिक समतोलासह खाद्यसुरक्षेसाठी...२०५० मध्ये जगाची लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोचेल...
जळगावात डाळिंब प्रतिक्विंटल २००० ते...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारी आल्याच्या बाजारभावात सुधारणासातारा ः आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे....
सोलापूर जिल्ह्यातील ‘दुष्काळ`...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून...
निवडणूक अायोगाच्या बोधचिन्हाची मानवी...बुलडाणा : येथील जिजामाता प्रेक्षागारात पाच हजार...
ऊसदर नियामक मंडळाची ‘आरएसएफ’प्रश्नी...पुणे : राज्यातील काही साखर कारखान्यांकडून महसुली...
राज्यात उन्हाचा चटका कायमपुणे   : कोरड्या व निरभ्र हवामानामुळे...
खानदेशात सूतगिरण्यांची वानवाजळगाव  ः खानदेशात कापूस हे प्रमुख पीक आहे....
दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहूर्त कशाला...औरंगाबाद  ः मराठवाड्यातील ७६ पैकी ५६ तालुक्‍...
सिंचन परिषदेतील विचार मंथनाची दिशा...सोयगाव, जि. औरंगाबाद   : केवळ चर्चा, प्रबोधन...
स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकांचा...फळभाज्या तसेच फळांच्या वाढीसाठी स्फुरद हे...