मिझोराममध्ये कॉंग्रेसचा दारुण पराभव

मिझोराममध्ये कॉंग्रेसचा दारुण पराभव
मिझोराममध्ये कॉंग्रेसचा दारुण पराभव

गुवाहाटी ः मिझोरामच्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी कॉंग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. गेली दहा वर्षे सत्तेबाहेर असलेल्या मिझो नॅशनल फ्रंटने (एमएनएफ) घवघवशीत यश मिळवित स्पष्ट बहुमत मिळविले आहे. विशेष म्हणजे सलग सात वेळा विजयी होण्याचा विक्रम करणारे राज्याचे मुख्यमंत्री पी. लालथनहावला यांना दोन मतदारसंघांतून पराभव स्वीकारावा लागला.

कॉंग्रेसने मिझोरामच्या निवडणुकीची धुरा लालथनहावला यांच्याकडे सोपविली होती. मात्र त्यांना स्वतःला दारूण पराभवाला सोमोरे जावे लागलेच, शिवाय कॉंग्रेसला ईशोन्यकडील एकमेव राज्यही गमवावे लागले. चंफाई (दक्षिण) मतदारसंघातून लालथनहावला यांचा पराभव 'एमएनएफ'चे टी. जे. लालनुनतुलंगा यांनी केला. सेरछिप्प मतदारसंघात 'झोराम पीपल्स मूव्हमेंट'चे (झेडपीएम) मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार लालधुहोमा यांच्याकडून झालेला पराभव लालनथनहावला यांच्या जास्त जिव्हारी लागला. या जागेवरून ते १९८४ पासून सात वेळा विजयी झाले आहेत. ते १९८९-१९९८ आणि २००८ पासून आतापर्यंत मुख्यमंत्री होते.

मावळत्या विधानसभेतल्या सत्तारूढ काँग्रेस पक्षाचे नेते, मुख्यमंत्री लालथानहावला यांना दक्षिण चंपाई आणि सेरछिप या दोन्ही जागांवर पराभव पत्करावा लागला आहे. या निवडणुकीत मिझोराम मधील मतदानाचा टक्का काहीसा घसरला होता, मात्र मिझो नॅशनल फ्रंटला प्रस्थापित विरोधी मताचा फायदा मिळाल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून दिसत आहे. 

मिझोराममध्ये विकास कामे केल्याचा दावा करीत काँग्रेसने निवडणूक लढवली असली तरी राज्यात असलेली संपूर्ण दारूबंदी शिथिल करण्याच्या काँग्रेस सरकारच्या निर्णयाला होणारा विरोध, राज्यातली पायाभूत सुविधांची विशेषतः रस्त्यांची गरज आणि जमिन वापराचे धोरण, महिलांचे प्रश्न आणि बेकायदेशीर स्थलांतरीतांच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली गेली होती. 

देशात आरोग्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आणि साक्षरतेत तिसऱ्या क्रमांकावर असणारे मिझोराम देशातल्या प्रगतीपथावर असणाऱ्या राज्यांपैकी एक आहे.  

पक्षीय बलाबल (कंसात यापूर्वीच्या निवडणुकीतील जागा)

मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) २६ (५)
कॉंग्रेस ५ (३४)
भाजप 
इतर 
एकूण जागा  ४०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com