agriculture news in Marathi, congress in power in dhapewada, Maharashtra | Agrowon

गडकरी यांच्या धापेवाडा गावात काँग्रेसची सत्ता
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

नागपूर ः केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे जन्मगाव असलेल्या धापेवाडा (ता. कळमेश्‍वर) ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा अक्षरशः सुपडा साफ झाला. या गावातील निवडणुकीत सरपंच म्हणून कॉंग्रेसचे सुरेश डोंगरे निवडून आले असून १७ सदस्यांच्या या ग्रामपंचायतीमध्ये कॉंग्रेसचे १६ सदस्य निवडून आले आहेत. आमदार सुनील केदार यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना गावातच चीत केल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतलेल्या पाचगावमध्येही भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले.

नागपूर ः केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे जन्मगाव असलेल्या धापेवाडा (ता. कळमेश्‍वर) ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा अक्षरशः सुपडा साफ झाला. या गावातील निवडणुकीत सरपंच म्हणून कॉंग्रेसचे सुरेश डोंगरे निवडून आले असून १७ सदस्यांच्या या ग्रामपंचायतीमध्ये कॉंग्रेसचे १६ सदस्य निवडून आले आहेत. आमदार सुनील केदार यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना गावातच चीत केल्याचे बोलले जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतलेल्या पाचगावमध्येही भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले.

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्‍वर तालुक्‍यातील धापेवाडा तीर्थस्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे. हे गाव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मूळ गाव असून, या गावात अद्यापही गडकरींचा वाडा आहे. या गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल महत्त्वपूर्ण आहे. या गावातील निवडणुकीची जबाबदारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष राजीव पोद्दार, गडकरींचे समर्थक रमेश मानकर यांच्यावर टाकली होती. रमेश मानकर व राजीव पोद्दार यांनी पूर्ण वेळ दिल्यानंतरही भाजपला पराभवाला सामोरे जावे लागल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. कॉंग्रेसकडून आमदार सुनील केदार व नागपूर जिल्हा परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते मनोहर कुंभारे यांनी ही बाजू पार पाडली.

या विजयाबद्दल बोलताना आमदार सुनील केदार सकाळशी बोलताना म्हणाले, नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या खोट्या आश्‍वासनांचा हा परिणाम आहे. ग्रामीण भागातील लोकांना आता कर्जमाफी, शेतमालाला भाव न मिळाल्याने पसरलेला असंतोष या निवडणुकीतून बाहेर आला आहे. कॉंग्रेसच्या सामान्य व निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विजय असल्याचे आमदार केदार यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उमरेड तालुक्‍यातील पाचगावला खासदार दत्तक गाव म्हणून विकास केला आहे. पाचगाव हे जिल्ह्यातील पहिली डिजिटल ग्रामपंचायत म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात बराच विकास केल्याचा दावा केला जात होता. परंतु ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मात्र लोकांनी कॉंग्रेसच्या बाजूने माप टाकले.

इतर अॅग्रो विशेष
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...