agriculture news in marathi, Congress Rathyatra against government from 1st January | Agrowon

सरकारच्या विरोधात कॉंग्रेसची 'रथयात्रा', १ जानेवारीला कोल्हापुरातून प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 डिसेंबर 2017

सोलापूर : राज्य शासनाच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने राज्यभर रथयात्रा काढण्यात येणार आहे. त्याची सुरवात पश्‍चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतून होणार आहे. 1 जानेवारीला कोल्हापूर येथून रथयात्रेला सुरूवात होईल. समारोप पुण्याला होणार आहे. मुंबईतील टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हे नियोजन निश्‍चित करण्यात आले.

सोलापूर : राज्य शासनाच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने राज्यभर रथयात्रा काढण्यात येणार आहे. त्याची सुरवात पश्‍चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतून होणार आहे. 1 जानेवारीला कोल्हापूर येथून रथयात्रेला सुरूवात होईल. समारोप पुण्याला होणार आहे. मुंबईतील टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हे नियोजन निश्‍चित करण्यात आले.

फसलेल्या कर्जमाफी योजनेसह घोटाळेबाज मंत्री-आमदारांना पाठीशी घालण्याच्या राज्य शासनाच्या भूमिकेविरोधात जनजागृती करण्यासाठी ही रथयात्रा असणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात तीन दिवस मुक्काम असेल. या कालावधीत ही यात्रा गावपातळीवर जाऊन सरकारविरोधी प्रचार करणार आहे. प्रदेशाध्यक्ष श्री. चव्हाण रथयात्रेत सहभागी होणार आहेत. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा आणि पुणे या क्रमाने रथयात्रेचे नियोजन करण्यात आले आहे.

जिल्हा व प्रमुख समन्वयक या प्रमाणे : कोल्हापूर - राजन भोसले व यशवंत हाप्पे, सांगली : प्रकाश यलगुलवार व धर्मा भोसले, सोलापूर : मोहन जोशी व रोहित टिळक, सातारा : अभय छाजेड व तौफीक मुलाणी, पुणे : आमदार रामहरी रूपनवर आणि अलका राठोड.

या संपूर्ण रथयात्रेत महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्‍वजीत कदम, सेवादलाचे मुख्य संघटक विलास औताडे, एनएसयुआयचे अध्यक्ष अमिर शेख, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष एम. एम. शेख, इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष राजू वाघमारे आणि ओबीसी विभागाचे अध्यक्ष प्रमोद मोरे सहभागी असणार आहेत.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...