गुजरातमध्ये काँग्रेसच्या ७६ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

गुजरातमध्ये काँग्रेसच्या ७६ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर
गुजरातमध्ये काँग्रेसच्या ७६ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

नवी दिल्ली ः गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ७६ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली अाहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची मंगळवारी (ता. २८) अंतिम मुदत अाहे. त्याअाधी काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केली अाहे.

याअाधी ८६ उमेदवारांची नावे जाहीर केली अाहेत. अद्याप २० उमेदवारांची नावे निश्चित झालेली नाहीत. काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अधिक प्रतिनिधित्व मिळण्याची अपेक्षा असलेल्या पाटीदार अनामत आंदोलन समितीला काँग्रेसच्या पहिल्या यादीत दोनच जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, भाजपने याअाधीच उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे.

दोन टप्प्यात होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी ९ अाणि १४ डिसेंबर रोजी मतदान होणार अाहे, तर १८ डिसेंबरला निकाल जाहीर होणार अाहे. पहिल्या टप्प्यात सौराष्ट्र अाणि दक्षिण गुजरातमधील ८९ जागांसाठी मतदान होणार अाहे, तर दुसऱ्या टप्प्यात मध्य अाणि उत्तर भागातील ९३ जागांसाठी मतदान होणार अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com