कृषिमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात काॅंग्रेस-भारिपची सरशी

कृषिमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात काॅंग्रेस-भारिपची सरशी
कृषिमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात काॅंग्रेस-भारिपची सरशी

बुलडाणा : ग्रामपंचायत निवडणूक निकालात कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या खामगाव तालुक्यात भाजपला चारपैकी एकाही ठिकाणी विजय मिळवता आला नाही. खामगाव तालुक्यात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली. श्री क्षेत्र अटाळी, रोहणा, जयपूर लांडे, घारोड या चार ग्रामपंचायतींच्या निकालात काॅंग्रेस, भारिप बहुजन महासंघाने झेंडा फडकावला. केंद्र, राज्यात, जिल्हा परिषदेत सत्तेत असलेल्या भाजपला मात्र या चारपैकी एकही जागा जिंकता आली नाही.

जयपूर लांडे येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सरपंचपदी काॅंग्रेसचे जुलालसिंग मानसिंग पवार हे 87 मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजपच्या शीला सहदेव लांडे यांना पराभूत केले. घारोड ग्राम पंचायतीमध्ये सरपंचपदावर काॅंग्रेसच्या शहनाज परवीन मोहम्मद रईस 116 मतांनी विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या विश्‍वनाथ जगन्नाथ गायकवाड यांचा पराभव केला. रोहणा येथे सरपंचपदी भारिप बहुजन व काॅंग्रेसचे कैलास नामदेव सावंग हे विजयी झाले.

श्री क्षेत्र अटाळी येथे काॅंग्रेस,भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार डाॅ. दिलीप काटोले विजयी झाले आहे. डाॅ. काटोले यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या रुपेश खेकडे यांचा 161 मतांनी पराभव करीत विजय संपादन केला. या ग्रामपंचायती निवडणुकीत मिळालेल्या यशाचा काँग्रेस व भारिप बहुजन महासंघाच्या नेते व कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोश साजरा करण्यात अाला. या यशाबद्दल नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा काँग्रेस माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी जोरदार सत्कार करीत अानंदोत्सव साजरा केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com