काँग्रेस-शिवसेना युतीचा नंदुरबारमध्ये विजय

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील तीन नगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकीत नंदुरबार पालिकेत शिवसेना आणि कॉँग्रेस युतीचा विजय झाला. तर तळोदा पालिकेत सत्तांतर झाले असून, काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या तळोदा पालिकेवर भाजपने सत्ता काबीज केली. तर नवापूर पालिकेवर कॉँग्रेसने आपली सत्ता कायम राखली आहे.

काँग्रेस आणि शिवसेना युतीने नंदुरबार पालिकेतील २७ जागांवर विजय मिळवून सत्ता मिळविली आहे. तर भाजप-रिपाइं यांच्या १२ जागा निवडून आल्या. पालिकेवर नगराध्यक्ष म्हणून काँग्रेसच्या रत्ना रघुवंशी यांनी ४ हजार ७८१ मतांनी विजय मिळविला.

नवापूर पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदी कॉँग्रेस पक्षाच्या हेमलता पाटील १ हजार ७४२ मतांनी विजयी झाल्या असून, पालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकांच्या २० जागांपैकी १४ जागांवर कॉँग्रेसचे नगरसेवक विजयी झाल्याने पालिकेवर पुन्हा कॉँग्रेसची सत्ता कायम राहिली. तर चार राष्ट्रवादी कॉँग्रेस, एक शिवसेना आणि एक अपक्ष असे उमेदवार विजयी झाले. तर भारतीय जनता पक्षाला खातेदेखील उघडता आले नाही. तळोदा पालिकेत भाजपची सरशी तळोदा पालिकेची सत्ता सर्वाधिक काळ कॉँग्रेसच्या ताब्यात होती. पण, यंदाच्या निवडणुकीत तळोदा पालिकेत नगराध्यक्षपदी भाजपचे अजय परदेशी, तर एकूण १८ पैकी भाजपचे ११ नगरसेवक विजयी झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com