agriculture news in marathi, congress to take community views for manifesto | Agrowon

कॉंग्रेस जाहीरनाम्यासाठी घेणार समाज घटकांचे मत
टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

नागपूर : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात झाल्यानंतर आता कॉंग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यासाठी देशभर फिरून देशातील विविध समाज घटकांचे मत जाणून घेण्याची मोहीम हाती घेतली आहे.

नागपूर : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात झाल्यानंतर आता कॉंग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यासाठी देशभर फिरून देशातील विविध समाज घटकांचे मत जाणून घेण्याची मोहीम हाती घेतली आहे.

अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या "आयडीयाज फॉर ए प्रोग्रेसीव्ह इंडिया' उपक्रमांतर्गत सोमवारी (ता.२६) समाजातील विविध घटकांच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. अ. भा. कॉंग्रेस समितीच्या संशोधन विभागाचे अध्यक्ष व राज्यसभा सदस्य प्रा. एम. व्ही. राजीव गौडा यांनी नागपुरातील समाजातील विविध घटकांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे प्रभावी होऊ शकतात. तसेच मतदारांवर प्रभाव असलेल्या घटकांचा मानस काय आहे? हे जाणून घेण्यासाठी खासदार गौडा नागपुरात आले आहेत. त्यांनी व्यापारी, उद्योजक, शेती क्षेत्रातील अभ्यासक, युवक, महिला, विचारवंतांशी चर्चा केली.

पुढील वर्षी लोकसभेची निवडणूक होणार आहे. कॉंग्रेस पक्षाची नेमकी भूमिका काय राहिली पाहिजे. निवडणूक जाहीरनाम्यात कोणत्या मुद्‌द्यांचा समावेश केला पाहिजे, यासाठी अहवाल तयार केला जाणार आहे. कॉंग्रेसच्या संशोधन विभागाचे अध्यक्ष म्हणून खासदार राजीव गौडा यांच्यावर ही जबाबदारी आहे. देशभर फिरून निवडणुकीपूर्वी दस्ताऐवज करण्याचा हा कॉंग्रेसचा पहिलाच प्रयत्न आहे. भारत मोठा देश असल्याने एका ठिकाणी बसून सर्व देशांतील लोकांच्या मनातील आकांक्षाची माहिती मिळत नाही. याचा प्रत्यय गुजरातमध्ये आला. गुजरात पॅटर्न आता सर्व देशांमध्ये राबविला जाणार आहे. महाराष्ट्र व राज्यातील प्रत्येक विभागाचे नेमके प्रश्‍न कोणते यावर फोकस केला जाणार असल्याचे खासदार गौडा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

प्रा. गौडा म्हणाले की, "अच्छे दिन'चे स्वप्न दाखवून भाजप सत्तेवर आला. आश्‍वासनांची पूर्तता या सरकारला करता आली नाही. नोटाबंदी, जीएसटीचा दुष्परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला आहे. जीडीपीचा दर घसरला आहे. अपेक्षित नवीन रोजगार निर्मिती झाली नाही. राफेल विमान खरेदीत घोटाळ्याचा आरोप होत आहे. मात्र, भ्रष्ट्राचारावर सरकार बोलायला तयार नसल्याचा आरोप खासदार गौडा यांनी केला. 

इतर ताज्या घडामोडी
द्राक्षावरील उडद्या भुंगेऱ्यांच्या...द्राक्ष विभागामध्ये ऑक्टोबर छाटणी व त्यानंतरचा...
कळमणा बाजारात सोयाबीन प्रतिक्‍विंटल...नागपूर ः कळमणा बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढती...
जनावरांच्या अाहारात बुरशीजन्य घटकांचा...अाहाराद्वारे जनावरांच्या शरीरात बरेच हानिकारक घटक...
मोहरी, जवस लागवड व्यवस्थापनरब्बी हंगामात तेलबिया पिके अत्यंत महत्त्वाची असून...
मुरघासाचे फायदे, जनावरांसाठी वापरचाऱ्याच्या कमतरतेमुळे दूध उत्पादनामध्ये सातत्य...
जळगाव जिल्ह्यात खरेदी केंद्रांतील...जळगाव : कडधान्य खरेदीसंबंधी शासकीय खरेदी...
टंचाईत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करा ः...नांदेड ः टंचाईच्या परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचे...
वऱ्हाडात सहा तालुक्‍यांत गंभीर दुष्काळअकोला : अनियमित आणि सरासरीपेक्षा कमी झालेल्या...
अमरावती जिल्ह्यातील ‘रब्बी`...अमरावती : कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी १ लाख ६८...
संकरित कपाशीचे ‘नांदेड ४४’ वाण...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने...
सांगली जिल्ह्यातील सर्वच तलाव आटलेसांगली ः ताकारी, टेंभू, आरफळ योजनेच्या पाण्यामुळे...
पुणे विभागात अवघ्या सहा टक्के पेरण्यापुणे ः पावसाळ्यात पडलेल्या पावसाच्या खंडाचा...
राज्यात दुष्काळसदृश नाही, तर दुष्काळ...मुंबई : यंदा झालेल्या कमी पावसामुळे राज्याच्या...
अवर्षणाचा पिकावरील ताण कमी करण्यासाठी...कोरडवाहू शेतीत पीक उत्पादनाच्या दृष्टीने “ओल तसे...
कोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्...कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या...
नगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ...
जनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...