गुजरातमध्ये सत्ता मिळाल्यास कर्जमाफी ः राहुल गांधी

गुजरातमध्ये सत्ता मिळाल्यास कर्जमाफी ः राहुल गांधी

लाठी/भावनगर, गुजरात ः गुजरातमध्ये कॉँग्रेसची सत्ता अाल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, असे अाश्वासन कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे दिले अाहे.

सध्या गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू अाहे. गुजरातमध्ये सत्ता मिळवण्यासाठी कॉँग्रेसकडून जोरदार प्रचार सुरू अाहे. राहुल गांधी ठिकठिकाणी सभा घेऊन प्रचार करत अाहे. त्यांनी गुरुवारी (ता. ३०) अमरेली जिल्ह्यातील लाठी येथे प्रचारसभा घेतल्या. हा भाग पाटीदार बहुल म्हणून ओळखला जातो. सौराष्ट्र भागातील प्रचार दौऱ्यात त्यांनी गढ्ढा येथील स्वामिनारायण मंदिराला भेट देऊन प्रार्थना केली.

राहुल गांधी म्हणाले, की पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या पाच-दहा उद्योजक मित्रांचे १.२५ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. मात्र, पंतप्रधान मोदी अाणि केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांना शेतकरी कर्जमाफी विचारले जाते; तेव्हा ते शेतकरी कर्जमाफीबाबत धोरण नसल्याचे सांगतात. मोदीजी गेल्या २२ वर्षांपासून शेतकऱ्यांविषयी बोलत अाहेत. मात्र त्यांनी शेतकऱ्यांना काहीच दिले नाही. उलट त्यांच्या जमिनी काढून घेतल्या जात अाहेत. त्यांचे पाणी उद्योगांकडे वळविले अाहे. शेतकऱ्यांना पीकविम्याचाही लाभ मिळालेला नाही, अशी टीका त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर केली अाहे.

गुजरातमध्ये कॉँग्रेस सत्तेवर अाल्यानंतर दहा दिवसांत कर्जमाफीबाबत धोरण तयार केले जाईल, असे अाश्वासन त्यांनी दिले अाहे. कर्जमाफीसह अनुदानित शाळांमध्ये मोफत शिक्षणाची व्यवस्था केली जाईल, असेही अाश्वासन त्यांनी दिले अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com