Agriculture News in Marathi, congress will start Agitation Against BJP Government, Maharashtra | Agrowon

कॉंग्रेसचे आजपासून जनआक्रोश आंदोलन
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

मुंबई : राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारच्या तीन वर्षेपूर्तीचे ढोल सरकारकडून वाजवले जात असताना दुसरीकडे नोटाबंदी आणि जीएसटीचा सर्वच स्तरातील लोकांना फटका बसला आहे. राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली; पण शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही. दुसरीकडे शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी संकटात आहे. सरकारविषयी जनतेच्या मनातील आक्रोश जनतेत जाऊन मांडण्यासाठी काॅंग्रेसचे जनआक्रोश आंदोलन मंगळवार (ता.३१) पासून  नगर येथून सुरू होत अाहे.

मुंबई : राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारच्या तीन वर्षेपूर्तीचे ढोल सरकारकडून वाजवले जात असताना दुसरीकडे नोटाबंदी आणि जीएसटीचा सर्वच स्तरातील लोकांना फटका बसला आहे. राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली; पण शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही. दुसरीकडे शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी संकटात आहे. सरकारविषयी जनतेच्या मनातील आक्रोश जनतेत जाऊन मांडण्यासाठी काॅंग्रेसचे जनआक्रोश आंदोलन मंगळवार (ता.३१) पासून  नगर येथून सुरू होत अाहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधीच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ३१ ऑक्टोबरपासून अहमदनगर, महाड, उस्मानाबाद, चंद्रपूर, अमरावती असे राज्यभर जनआक्रोश मेळावे घेतले जाणार अाहेत, तर ८ नोव्हेंबर हा नोटाबंदीचा दिवस काळा दिवस म्हणून कॉंग्रेसकडून साजरा करण्यात येणार आहे.

शेतकरी कर्जमाफीतील त्रुटी, वाढत्या शेतकरी आत्महत्या, हमीभावापेक्षा कमी दराने होणारी खरेदी आणि महावितरणची शेतकरी विरोधी कारवाई यावर काॅंग्रेसने राज्य सरकारवर टीका केली आहे. जनआक्रोश आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात ठिकठिकाणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठका पार पडल्या असून, आंदोलन व्यापक स्वरूपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या व कीटकनाशकांच्या बळींची संख्या वाढतच आहे. याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप कॉंग्रेससकडून यापूर्वीच करण्यात आला आहे. कापसला ३५०० रुपये, तर सोयाबीनला २१०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.

धानाचीही अशीच अवस्था आहे. कापसाला ७००० तर सोयाबीनला ५००० रुपये भाव मिळावा. राज्य सरकार उत्पादन खर्चाच्या आधारे शेतमालाचे भाव काढते; परंतु शेतमालाचे भाव केंद्रीय कृषिमूल्य आयोग निश्चित करते. केंद्राचे भाव कमी असल्याने या भावातील फरकाची रक्कम राज्य सरकारने शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे.

राज्य सरकार सर्व आघाड्यावर अपयशी ठरल्याने जनतेत आक्रोश आहे. काँग्रेस जनआक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून जनतेच्या पाठीशी उभी आहे. नागपूर येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर ‘शेतकरी दिंडी’ काढण्यात येणार आहे.
- अशोक चव्हाण, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

इतर ताज्या घडामोडी
प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध शेतकऱ्याचा...मुंबई : धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या...
हिरव्या मिरचीच्या दरात जळगावात सुधारणाजळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शेतकरी कन्या झाली उत्पादन शुल्क निरीक्षकयवतमाळ : इंजिनिअर होऊन प्रशासकीय सेवेत आपले...
चिकू बागेत आच्छादन, पाणी व्यवस्थापन...चिकूचे झाड जस जसे जुने होते त्याप्रमाणे त्याचा...
‘गिरणा’तून दुसरे आवर्तन सुरू पण... जळगाव  ः जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वपूर्ण...
मातीच्या ऱ्हासासोबत घडले प्राचीन...महान मानल्या जाणाऱ्या अनेक प्राचीन संस्कृतींचा...
अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी सूचना...मुंबई : शासनाच्या ध्येय-धोरणांचे प्रतिनिधीत्व...
माफसूला जागतिक स्तरावर लौकिक मिळवून...नागपूर : पदभरती, ॲक्रीडेशन यासारखी आव्हाने...
कर्जमाफीची रक्कम द्या; अन्याथ लेखी द्यापुणे : २००८ मधील कर्जमाफीची रक्कम नाबार्डने...
नुकसानभरपाईची मागणी तथ्यांवर आधारित...नागपूर : नॅशनल सीड असोसिएशनने बोंड अळीला...
बदल्यांअभावी राज्यात कृषी... नागपूर : राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कृषी...
हवामान बदलाचा सांगलीतील द्राक्ष बागांना... सांगली  ः गेल्या दोन दिवसांपासून हवामानात...
साताऱ्यातील चौदाशेवर शेतकरी ठिबक...सातारा : जिल्ह्यातील २०१६-१७ मध्ये चौदाशेवर...
सोलापूर बाजारात कांद्याच्या दरात पुन्हा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रब्बी पेरणीत बुलडाण्याची आघाडी अकोला  ः अमरावती विभागात यंदाच्या रब्बी...
कोल्हापुरात हिरवी मिरची तेजीतकोल्हापूर : येथील बाजारसमितीत या सप्ताहात हिरवी...
सरकार कीटकनाशक कंपन्यांच्या दबावात यवतमाळ (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीतून...
पुण्यात गवार, भेंडी, चवळीच्या दरात अल्प...पुणे : गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये रविवारी (...
मृदा आरोग्य पत्रिकावाटपात पुणे आघाडीवरपुणे : शेतकऱ्यांना जमिनीत असलेल्या अन्नद्रव्याचे...
बदलत्या वातावरणामुळे ब्रॉयलर्स मार्केट... मागणी आणि पुरवठ्यातील संतुलनामुळे अंडी आणि...