करवीर तालुक्‍यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी

करवीर तालुक्‍यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी
करवीर तालुक्‍यात लघुपाटबंधारे विभागात उपसाबंदी

कोल्हापूर : करवीर तालुक्‍यातील लघू पाटबंधाऱ्याच्या कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, दऱ्याचे वडगाव जलाशयातील शेतीसाठी पाणी उपसा व बंदी कालावधी निश्‍चित झाला आहे. पंचगंगा पाटबंधारे उपविभागाचे सहायक अभियंता शशांक शिंदे यांनी ही माहिती दिली. 

उपसा व बंदी कालावधी असा ः  उपवडे ः १० ते २० डिसेंबर, २४ डिसेंबर ते ३ जानेवारी २०१९, ७ ते १७ जानेवारी, २१ ते ३१ जानेवारी, ४ ते १४ फेब्रुवारी, १९ फेब्रुवारी ते पुढील आदेशापर्यंत उपसाबंदी राहणार आहे. उपवडे धरण पायथ्यापासून ते बोलोली बंधाऱ्यापर्यंत उपसाबंदी कालावधी १० ते १३ डिसेंबर २०१८, १७ ते २० डिसेंबर, २४ ते २७ डिसेंबर, ३१ डिसेंबर ते ३ जानेवारी २०१९, ७ ते १० जानेवारी, १४ ते १७ जानेवारी, २१ ते २४ जानेवारी, २८ ते ३१ जानेवारी, ४ ते ७ फेब्रुवारी, ११ ते १४ फेब्रुवारी, १८ ते २१ फेब्रुवारी व २५ फेब्रुवारीपर्यंत उपसाबंदी राहणार आहे. 

कणेरीवाडी ः ७ ते २१ डिसेंबर, २८ डिसेंबर ते ११ जानेवारी २०१९, १८ जानेवारी ते १ फेब्रुवारी, ८ ते २२ फेब्रुवारी, १ ते १५ मार्च, २२ मार्च ते ५ एप्रिल, १२ ते २६ एप्रिल, ३ मे ते १७, २४ मे ते पुढील आदेशापर्यंत उपसाबंदी राहणार आहे.  कंदलगाव ः ७ ते २१ डिसेंबर, २८ डिसेंबर ते ११ जानेवारी, १८ जानेवारी ते १ फेब्रुवारी, ८ ते २२ फेब्रुवारी, १ ते १५ मार्च, २२ मार्च ते ५ एप्रिल, १२ ते २६ एप्रिल, ३ ते १७ मे व २४ मे ते पुढील आदेशापर्यंत उपसाबंदी राहणार आहे. 

राजाराम तलाव ः ७ ते २१ डिसेंबर, २८ डिसेंबर ते ११ जानेवारी, १८ जानेवारी ते १ फेब्रुवारी, ८ ते २२ फेब्रुवारी, १ ते १५ मार्च, २२ मार्च ते ५ एप्रिल, १२ ते २६ एप्रिल, ३ ते १७ मे व २४ मे २०१९ ते पुढील आदेशापर्यंत उपसाबंदी राहणार आहे.  दऱ्याचे वडगाव ः ७ ते २१ डिसेंबर, २८ डिसेंबर ते ११ जानेवारी, १८ जानेवारी ते १ फेब्रुवारी, ८ ते २२ फेब्रुवारी, १ ते १५ मार्च, २२ मार्च ते ५ एप्रिल, १२ ते २६ एप्रिल, ३ ते १७ मे व २४ मे ते पुढील आदेशापर्यंत उपसाबंदी राहणार आहे.

शेतकऱ्यांना इशारा  उपसाबंदी कालावधीत अनधिकृत उपसा आढळून आल्यास संबंधित उपसायंत्रधारकांचा परवाना वर्षासाठी रद्द करण्यात येईल. या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com