agriculture news in Marathi, consumer forum gave shock to MSEDCL in nashik district, Maharashtra | Agrowon

ग्राहक पंचायतीचा 'महावितरण'ला दणका
टीम अॅग्रोवन
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

नाशिक : कृषिपंपधारकांवर थकित वीजबिलापोटी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणने सुरू केली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांना रीडिंग न घेताच अव्वाच्या सव्वा वीजबिले दिली. ग्राहक पंचायतीने अशा एका प्रकरणात चांदोरी येथील शेतकऱ्यास १० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहे. 

नाशिक : कृषिपंपधारकांवर थकित वीजबिलापोटी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणने सुरू केली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांना रीडिंग न घेताच अव्वाच्या सव्वा वीजबिले दिली. ग्राहक पंचायतीने अशा एका प्रकरणात चांदोरी येथील शेतकऱ्यास १० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहे. 

सध्या कृषिपंपांच्या थकीत बिलापोटी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. नाशिक शहर मंडलातील १ लाख ६५ हजार कृषिपंप ग्राहकांकडे ५९१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यातील १ लाख ६४ हजार ग्राहकांकडे ४३ कोटी रुपयांची चालू बिले थकीत आहेत. मालेगाव मंडलातील १ लाख ३९ हजार कृषिपंप ग्राहकांकडे ५९२ कोटी रुपयांची वीजबिले थकीत असून यातील १ लाख ३८ हजार ३०० ग्राहकांकडे ३५ कोटी ४२ लाख रुपयांची चालू थकबाकी आहे. मात्र थकबाकी असलेल्या अनेक शेतकऱ्यांना मीटर रिडींग न घेताच अंदाजे बिले प्राप्त झाली.

यापैकीच चांदोरी येथील शेतकरी जगन्नाथ नाठे यांना ३२ हजार रूपये वीज बील प्राप्त झाले. यासंदर्भात त्यांनी ग्राहकपंचायतीकडे धाव घेतली असता वीज कायदा २००३ सेक्शन ५५ व ५७ तसेच भरपाईचा कायदा २००५ नुसार अंदाजे दिलेले बिल बेकायदा असून त्याबद्दल प्रतीमाह ४०० रुपयेप्रमाणे १० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले. तसेच अंदाजे बिल व प्रत्यक्ष रीडिगनुसार बिल यातील फरक संबधित मीटर रीडर इंजिनिअर यांच्या पगारातून कापण्यात यावा, असेही या आदेशात म्हटले आहे. नाठे यांना ३२ हजार रुपये बिल आले होते.

मात्र, प्रत्यक्षात ८ हजार रुपये बिल झाले. त्यांना १० हजार रुपये भरपाई मिळवून देण्यात आली. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना अशा प्रकारची अंदाजे बिले प्राप्त झाली असतील त्यांनी वीज ग्राहक तक्रार समिती विद्युत भवन नाशिक रोड येथे तक्रार दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

इतर अॅग्रो विशेष
उठलेला बाजारसंसदेचे आणि राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन...
न्यायाच्या प्रतीक्षेत आदिवासी शेतकरी राज्यातील आदिवासी भागात लाखो शेतकरी आपल्या...
तूर, हरभरा खरेदीचे तीनतेरापुणे : राज्यात यंदाच्या हंगामात (२०१७-१८)  ...
सरकारी खरेदीच्या खेळखंडोब्यामुळे...पुणे : आधारभूत किमतीने शेतमाल खरेदीचा...
विदर्भात पोचली ‘एचटी’ची पाकिटे?नागपूर : गेल्या हंगामात पुरवठा झालेल्या अनधिकृत ‘...
तूर खरेदीत कर्नाटकची महाराष्ट्रावर आघाडीपुणे : तूर खरेदीच्या बाबतीत महाराष्ट्र...
राज्य सहकारी संघ पदाधिकारी निवडणूक...पुणे  : महाराष्ट्र राज्य सहकारी संघ...
सरकारी खरेदीतील अडथळे दूर करण्यासाठी...राज्यात गेल्या वर्षी खरेदी केलेली तूर...
गोदाम नसल्यामुळे शेतीमाल खरेदीला ब्रेकराज्य सरकारने `नाफेड` या नोडल एजन्सीच्या...
शासकीय खरेदीचे दुखणे अन् भावांतराची...राज्यात यंदा खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांतील...
उत्पादकता निकषामुळे तूर उत्पादकांना...नगर ः आधारभूत किमतीने तुरीची खरेदी करण्यासाठी...
शेतीमाल खरेदीतील भ्रष्टाचार रोखणे आवश्यकपुणे : सरकारने हमीभावाने शेतमाल खरेदी करण्यासाठी...
तत्काळ चुकाऱ्याची केवळ घोषणाचअकोला ः या हंगामात हमीभावाने सुरू असलेली खरेदी...
तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्यात मंगळवारपासून बहुतांशी ठिकाणी...
अन्नदात्यासाठी राज्यभरात ‘अन्नत्याग’पुणे ः राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येचा...
कृषिसेवक परीक्षा संशयास्पद; विद्यार्थी...पुणे : कृषिसेवक पदाच्या ९०३ जागांसाठी राज्यात...
उसाला निर्यातक्षम केळीची जोडसांगली जिल्ह्यातील तुंग हा उसाचा हुकमी पट्टा. या...
जगभरात अवशेषमुक्त मालालाच मागणीपुणे : निर्यातीत युरोपीय देशांप्रमाणे अन्य...
पूर्णधान्य आहाराचा आरोग्यासाठी होतो...आरोग्यासाठी साध्या धान्यांच्या तुलनेमध्ये...
सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी :...नवी दिल्ली  : २०१९ मध्ये सत्तेत आल्यास...