agriculture news in marathi, contaminate water in villages, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषित
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 मे 2019

नगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने जिल्हा परिषद व भूजल सर्वेक्षण विभागाने तपासले असून, त्यांतील १२४ गावांतील पाणी दूषित आढळून आले. हे प्रमाण ४.६९ टक्के एवढे कमी असले, तरी पावसाळ्यात ते वाढते. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

नगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने जिल्हा परिषद व भूजल सर्वेक्षण विभागाने तपासले असून, त्यांतील १२४ गावांतील पाणी दूषित आढळून आले. हे प्रमाण ४.६९ टक्के एवढे कमी असले, तरी पावसाळ्यात ते वाढते. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. भूगर्भातील पाणीसाठा जमिनीपासून अकरा मीटरपेक्षाही खोल गेला आहे. अनेक विहिरी व जलाशय आटू लागले आहेत. यंदा मॉन्सूनही पाच दिवस उशिरा दाखल होण्याचा अंदाज आहे. तसेच सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी पावणेआठशे टॅंकर सुरू आहेत. कूपनलिका, विहिरी, तलावांमध्ये अतिशय कमी पाणी शिल्लक आहे. हा पाणीसाठा पिण्यास योग्य असावा,

यासाठी जिल्हा परिषदेतील आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहे. सध्या १२४ गावांतील पाणी दूषित असल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाने दिला आहे. या अहवालानुसार नगर तालुक्‍यात सर्वाधिक दूषित पाणीसाठे आढळून आले, तर श्रीरामपूर तालुका हा सर्वाधिक शुद्ध जल असलेला तालुका ठरला. श्रीरामपूर तालुक्‍यात एकाही गावात दूषित पाणी आढळून आलेले नाही. 

सर्वाधिक दूषित पाणी नगर तालुक्‍यात
जिल्ह्यातील सर्वाधिक दूषित पाणीसाठे नगर तालुक्‍यात आढळून आले आहेत. तालुक्‍यातील निमगाव घाणा, देऊळगाव, गुणवडी, गुंडेगाव, खडकी, खंडाळा, बाबुर्डी बेंद, हिवरे, घोसपुरी, सारोळा कासार, कोल्हेवाडी, हातवळण, मठपिंप्री, बाळेवाडी या गावांतील पाणीसाठे दूषित आढळले आहेत.
 
दूषित पाणीसाठ्यांची आकडेवारी : पारनेर २७, अकोले ७, नगर ३४, संगमनेर ६, शेवगाव ८,पाथर्डी     १२,राहुरी ६, जामखेड १,श्रीगोंदे ८, कोपरगाव ३, कर्जत ८, नेवासे ३, राहाता १. 

इतर ताज्या घडामोडी
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
बीबीएफ तंत्रज्ञानानेच पेरणी, विश्वी...बुलडाणा ः येत्या हंगामात बीबीएफ तंत्रज्ञानाने...
सांगली जिल्ह्यात १८३ गावांना टँकरने...सांगली : जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा संपला...
जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे...जळगाव  ः खानदेशात सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून...
आषाढी वारीत शासकीय महापूजेचा वेळ...सोलापूर : आषाढी एकादशी दिवशीची श्री विठ्ठल-रुक्‍...
जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुलावरून...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
वऱ्हाडात महाबीज बियाणे मिळण्यापूर्वी...अकोला ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम व ग्राम...
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात...सातारा  : टेंभू उपसा सिंचन योजनेतून खटाव...
मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात...मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९८...
पाऊस लांबल्याने आता कोणते पीक घ्यावे?...नगर : मॉन्सून लांबल्याने आता खरीप पिकांत बदल...