नगर जिल्ह्यात ५६ गावांत पितात दूषित पाणी

नगर जिल्ह्यात ५६ गावांत पितात दूषित पाणी
नगर जिल्ह्यात ५६ गावांत पितात दूषित पाणी

नगर ः पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील आठ हजार २०१ पाणी नमुन्यांची तपासणी केली आहे. त्यातील ५४९ नमुने दूषित आढळले आहेत. त्याचप्रमाणे ६.६९ टक्के असून, ५६ गावांतील ग्रामस्थ सध्या हे दूषित पाणी पीत आहेत.

दूषित पाण्याचे सर्वाधिक प्रमाण पारनेर तालुक्‍यात आहे. या तालुक्‍यातील ६८१ नमुन्यांपैकी ९२ नमुने दूषित आढळले आहेत. या तालुक्‍यातील रेनवडी, नांदूर पठार, कुरुंद, कोहकडी, म्हसे, पिंपळणे या गावांतील पाणी नमुने दूषित आढळले आहेत. त्याखालोखाल राहुरी तालुक्‍यात ४४० नमुन्यांपैकी ५७ नमुने दूषित आढळले आहेत. विशेष म्हणजे, या तालुक्‍यातील केसापूर व टाकळीमियॉं या दोन गावांतीलच नमुने अधिक दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नगर तालुक्‍यातून ५८५ पाणी नमुन्यांपैकी ६१ नमुने दूषित आढळले. ते सर्व अरणगावचे आहेत. अकोले तालुक्‍यातील एक हजार १७७ नमुन्यांपैकी ६८ नमुने दूषित आढळले. ते म्हाळुंगी, पिंपळदरी, पाडोशी, खिरविरे, मन्याळे, पिसेवाडी येथील आहेत. संगमनेर तालुक्‍यातील ६८३पैकी ३७ नमुने दूषित आढळले आहेत. या तालुक्‍यातील कोठे, गोडसेवाडी, पिंपळगाव माथा, परुडी पठार, सोनेवाडी, सागर वसाहत, मालुंजे, पिंप्री तिखी, कासारे, निळवंडे या गावांतील पाणी नमुने दूषित आढळले आहेत.

शेवगाव तालुक्‍यातील लाडजळगाव, बोधेगाव, गाडे जळगाव, लाखेफळ, कोळगाव, चापडगाव, नांदूर या गावांतील पाणी नमुने दूषित आढळले आहेत. पाथर्डीतील कळस पिंप्री, लांडकवाडी, शिरसाठवाडी, चिंचपूर, पारेवाडी, चितळी, मिडसांगवी, जवखेडे खालसा येथे दूषित पाणी आढळले आहे. जामखेडमधील पिंपळगाव वाघा, खर्डा, वंजारवाडी, माळेवाडी, जवळके येथील पाणी नमुने दूषित आढळले आहेत. श्रीगोंद्यात रायगव्हाण, कोपरगावमध्ये पोहेगाव, सोनेवाडी, मनेगाव, शहांजापूर, राहात्यात बाभळेश्‍वर, श्रीरामपूरमध्ये माळेवाडी, गोवर्धन, पढेगाव, श्रीरामपूर येथे दूषित पाणी आढळले आहे. कर्जत तालुक्‍यातील ३४९ पैकी १८ व नेवासे तालुक्‍यात ४५७ पैकी २५ पाणी नमुने दूषित आढळले आहेत.

निकृष्ट ब्लिचिंग पावडरचा वापर पाणीशुद्धीकरणासाठी ब्लिचिंग पावडरचा पुरवठा ग्रामपंचायतींना करण्यात येतो; परंतु तिचा नियमित वापर केला जात नाही. १६ ग्रामपंचायतींमध्ये याबाबत अनियमितता आढळली आहे. या पावडरचे एक हजार ३०३ नमुने तपासण्यात आले. त्यांपैकी ७८ नमुने निकृष्ट आढळले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com