संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणी

नगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार आग्रही आहे. शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी सरकारकडून कोट्यवधींचा खर्च केला जातो, तरीही शंभर टक्के गावांमध्ये शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची तपासणी केल्यानंतर, मार्चअखेर १२८ गावांतील पाणी नमुने दूषित असल्याचे आढळले. वर्षभरात हाच आकडा एक हजार ३३६ होता.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नियमितपणे पाणी नमुने तपासले जातात. ज्या गावांमधील पाणी दूषित आहे, त्या ग्रामपंचायतींना सूचना दिल्या जातात. वर्षभरात जिल्हा परिषदेने वीस हजार गावांतील पाणी नमुन्यांची तपासणी केली. त्यांतील १३३६ गावांतील पाणी दूषित होते. ज्या गावांतील स्रोतांचे पाणी दूषित आढळले, तेथे पाणी शुद्धीकरणासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही दिले. मात्र, दर महिन्यात नवनव्या गावांमध्ये दूषित पाणी आढळणे सुरूच राहिले. पाण्यातील क्‍लोरीन सरासरी ३३ टक्के असावे, असा नियम आहे. वडनेर, भोयरे गांगर्डा, म्हसणे, वाघुंडे खुर्द, रुईछत्रपती (पारनेर), अरणगाव (श्रीगोंदे), पिंपळवाडी (राहाता), चिंचाळे (राहुरी), जेऊर कुंभारी, ब्राह्मणगाव, लौकी, गोधेगाव, तिळवणे (कोपरगाव), मतेवाडी, सातेफळ, तरडगाव, घोडेगाव (जामखेड), मंगळापूर (नेवासे) या गावांमध्ये २० टक्‍क्‍यांपेक्षा कमी क्‍लोरीन आढळले.

मार्च महिन्यातील दूषित पाणी नमुने  (कंसात तपासलेले नमुने) पारनेर : १३ (१६४), अकोले : ३ (२३२), नगर : २३ (१३६), संगमनेर : २४ (१९५), शेवगाव : ८ (११९), पाथर्डी : ६ (२३३), राहुरी : ४ (४५), श्रीगोंदे : ११ (१९४), कोपरगाव : ४ (१३५), कर्जत : ११ (८९), नेवासे : ३ (६०), राहाता : २ (६५), श्रीरामपूर : ६ (७३), जामखेड १० (१४३).

दूषित पाणीपुरवठा होणारी गावे पिंपळगाव तुर्क, वडगाव दर्या, पळसपूर, हत्तलखिंडी, बुगेवाडी, वाळवणे, सुपे, रुईछत्रपती, नारायणगव्हाण, कडूस पाडळी (पारनेर) , तेरुंगण, शेंडी, भंडारदरा (अकोले) , रांजणी, आगडगाव, राळेगण, हिवरेबाजार, पिंपळगाव वाघा, देऊळगाव, वाळकी, गुणवडी, घोसपुरी, सारोळे, चिचोंडी, नारायणडोह, दहिगाव, साकत (नगर) , गरडवाडी, जोहरापूर, शिंगोरी, भातकुडगाव, ताजनापूर, मुर्शतपूर, भगूर, मंगळूर खुर्द (शेवगाव) , तोंडोळी, सोमठाणे, रांजणी, जोगेवाडी, शिरापूर, विजयनगर (पाथर्डी), वडनेर, बोधेगाव, चिखलठाण, आरडगाव (राहुरी) , नान्नज, जवळे, मोजेवाडी (जामखेड) , तरडगव्हाण, गव्हाणेवाडी, चांभुर्डी, घोटवी, कोळगाव, पिसोरे खांड, रुईखेल (श्रीगोंदे) , मढी बुद्रुक, मनेगाव, पढेगाव, करंजी (कोपरगाव) , बहिरोबावाडी, कोरेगाव, बिटकेवाडी, बेलवंडी, तळवडी, निमगाव गांगर्डा, घुमरी, डिकसळ, बेलगाव, मिरजगाव (कर्जत) , पाथरवाला (नेवासे), निमगाव कोऱ्हाळे, वाकडी (राहाता) , भोकर (श्रीरामपूर).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com