सोलापुरात शनिवारी होणार सहकार परिषद

सोलापुरात शनिवारी होणार सहकार परिषद
सोलापुरात शनिवारी होणार सहकार परिषद

सोलापूर : सहकार भारती आणि सहकार सुगंध यांच्या वतीने शनिवारी (ता. ३ मार्च) दुपारी तीन वाजता सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वागताध्यक्ष अविनाश महागावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याच कार्यक्रमात सहकार सुगंध अहवाल स्पर्धेचे पारितोषिक वितरण सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत होईल. या वेळी महापौर शोभा बनशेट्टी, "सहकार भारती'चे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदयराव जोशी, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेखर चरेगावकर, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बॅंक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर उपस्थित राहणार आहेत. या वेळी सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे, पुणे विभागीय सहनिबंधक दीपक तावरे, सोलापूर जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, शहर उपनिबंधक कुंदन भोळे हेही उपस्थित राहणार आहेत. परिषदेतील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतर सहकार सुगंध मासिकाच्या वतीने नागरी सहकारी बॅंका व पतसंस्थांच्या वार्षिक अहवाल स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होईल. यंदाच्या वर्षी राज्यातून २५० बॅंका आणि ७५० पतसंस्थांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. देवगिरी, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, मुंबई व पश्‍चिम महाराष्ट्र अशा विभागवार एकूण ५० संस्थांना या वेळी पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. या परिषदेच्या निमित्ताने "सहकार भारती'च्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठकदेखील सिंहगड इन्स्टिट्यूट या ठिकाणी होणार आहे. या बैठकीस राज्यभरातून सर्व तालुका व जिल्हा स्तरावरून ३०० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेस स्वागत समितीचे सचिव प्रशांत बडवे, पश्‍चिम महाराष्ट्र संघटनप्रमुख अनिल वळसंगकर, सहसंघटनप्रमुख सहकार सुगंधचे संपादक भालचंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com