agriculture news in marathi, Cooperative Development Corporation will be able to sell shares | Agrowon

सहकार विकास महामंडळाला शेअर्स विक्रीतून सक्षम करणार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

सोलापूर : "सहकारी पतसंस्थांना भविष्यात आर्थिक मदत करणे, विकास सोसायट्यांचे सक्षमीकरण करणे, अडचणीतील पतसंस्थांना आर्थिक पाठबळ देणे आणि राज्यातील सहकार समृद्ध करण्याकरिता महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ सक्षम करणे आदींसाठी शेअर्स विक्री करून महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाईल,''अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी (ता. १२) दिली.

सोलापूर : "सहकारी पतसंस्थांना भविष्यात आर्थिक मदत करणे, विकास सोसायट्यांचे सक्षमीकरण करणे, अडचणीतील पतसंस्थांना आर्थिक पाठबळ देणे आणि राज्यातील सहकार समृद्ध करण्याकरिता महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ सक्षम करणे आदींसाठी शेअर्स विक्री करून महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाईल,''अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी (ता. १२) दिली.

महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळाची सभा सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात झाली. त्या वेळी देशमुख बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, व्यवस्थापक मिलिंद आकरे, विशेष कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, पतसंस्था फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दिलीप पतंगे आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, "सोलापूर जिल्ह्यातील २४ सहकारी संस्था, पतसंस्थांनी सुमारे सव्वा कोटींचे भाग घेण्याकरिता सहमती दर्शविली आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांतूनही सहकार विकास महामंडळाच्या शेअर्स विक्रीसाठी प्रयत्न केले जातील. राज्यातील पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या ठेवींना आता विमा संरक्षण देण्यात येणार आहे. ठेवीदारांच्या पैशाची काळजी घेणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. विश्‍वास आणि प्रामाणिकपणावरच हा व्यवहार चालतो. त्यादृष्टीने पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी काम करावे. दरम्यान देशमुख यांच्याशी संबंधित संस्थांनी सहकार विकास महामंडळाचे ११ लाखांचे भाग घेतले.

आकरे म्हणाले, "पतसंस्थांच्या आर्थिक सक्षमीकरणाची गरज आहे. त्यासाठी महामंडळाला संस्थांनी मदत द्यावी. त्या माध्यमातून भविष्यात पतसंस्थांनाच आर्थिक साह्य देणे शक्‍य होईल. तसेच विविध उपक्रमांसाठीही हा निधी खर्च करता येईल.’’

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...