agriculture news in marathi, Coordination to keep the collector in water level in Pune | Agrowon

पुण्यात पाणीवाटपात जिल्हाधिकारी ठेवणार समन्वय
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

पुणे ः गेल्या दोन दिवसांपूर्वी राज्यासह, पुणे जिल्ह्यात शासनाने दुष्काळसदृश स्थिती जाहीर केली आहे. मात्र, जिल्ह्यातील धरणांमध्ये जवळपास ८० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे शहराला पिण्यासाठी, तर ग्रामीण भागात शेतीसाठी आवश्यक असलेले पाणीवाटपाबाबत जलसंपदा विभाग आणि महानगरपालिका यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी घेतली आहे.

चालू वर्षी पावसाळ्यात जिल्ह्याच्या पश्चिम पट्यातील काही भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे बहुतांशी धरणे भरली आहेत. मात्र, परतीचा पाऊस न झाल्याने पाणीटंचाईची स्थिती तयार झाली आहे.

पुणे ः गेल्या दोन दिवसांपूर्वी राज्यासह, पुणे जिल्ह्यात शासनाने दुष्काळसदृश स्थिती जाहीर केली आहे. मात्र, जिल्ह्यातील धरणांमध्ये जवळपास ८० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे शहराला पिण्यासाठी, तर ग्रामीण भागात शेतीसाठी आवश्यक असलेले पाणीवाटपाबाबत जलसंपदा विभाग आणि महानगरपालिका यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी घेतली आहे.

चालू वर्षी पावसाळ्यात जिल्ह्याच्या पश्चिम पट्यातील काही भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे बहुतांशी धरणे भरली आहेत. मात्र, परतीचा पाऊस न झाल्याने पाणीटंचाईची स्थिती तयार झाली आहे.

या परिस्थितीबद्दल जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले, ‘‘धरणांमध्ये असलेला पाणीसाठा समाधानकारक आहे. त्यामुळे पाणीवाटपाबाबत समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी जलसंपदा विभाग, महानगरपालिका यांच्यासोबत बैठक घेऊन आढावा घेतला जाणार आहे. या सर्व विभागाकडून जिल्हा प्रशासनाला रोज पाण्याची स्थिती प्राप्त होत आहे.’’

जिल्ह्याच्या पूर्व पट्यातील इंदापूर, बारामती, दौंड आणि शिरूर तालुक्यात ४५ ते ५० टक्केहून कमी पाऊस झाला आहे. जिल्हा प्रशासनाला ३३ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस असल्यास तेथे दुष्काळ जाहीर करावा लागतो. अशा निकषानुसार अहवाल मागविला आहे. धरणसाठा ८० टक्के असून पाणी टंचाई निर्माण होणार नाही. परंतु हे पाणी पुढील मे महिन्यापर्यंत पुरविण्यााठी नियोजनात्मक पद्धतीने वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यासोबत लवकरच समन्वय साधून बैठक घेण्यात येईल. जुन्नर तालुक्यात यंदा १२७ टक्के पाऊस झाला असला, तरी पावसामध्ये सातत्य नसल्याने भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जुन्नर तालुका दुष्काळसदृश्य नसला तरी नुकसान झालेल्या पिकांचा अहवाल मागविण्यात आला आहे.

साठ लाख टन चाऱ्यांचे नियोजन
जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. इंदापूर, दौंड, बारामती आणि शिरूर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे. कमी पाण्यामुळे अनेक पिकांना फटका बसला असून, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत संपूर्ण अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकर अंतिम अहवाल तयार होईल. तत्पूर्वी जिल्हा प्रशासनाने सुमारे ६० लाख टन चारा उपलब्ध होण्याचे नियोजन केले असून हा चारा पुढील जानेवारीपर्यंत टिकेल. त्यामुळे चारा टंचाई भासणार नाही.

 

इतर बातम्या
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
महावितरणच्या कामात सुधारणा व्हायला हवी...जळगाव ः ‘महावितरण’च्या कार्यपद्धतीबाबत सामान्य...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...