agriculture news in marathi, Core committee meet today on farmers agitation countrywide | Agrowon

राज्यात चौथ्या दिवशी ठिकठिकाणी आंदोलने
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 जून 2018

पुणे : राष्ट्रीय किसान महासंघाने पुकारलेल्या संपानिमित्त चौथ्या दिवशी (ता.४) राज्यात ठिकठिकाणी रास्तो रोको आणि शेतमाल न पाठविण्याचे आंदोलन सुरूच होते. आंदोलनाबाबत केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला. महासंघाची राष्ट्रीय कोअर कमिटीची बैठक आज (ता.५) दिल्लीत होत असून, आंदोलनाची पुढील भूमिका निश्‍चित केली जाणार आहे. 

पुणे : राष्ट्रीय किसान महासंघाने पुकारलेल्या संपानिमित्त चौथ्या दिवशी (ता.४) राज्यात ठिकठिकाणी रास्तो रोको आणि शेतमाल न पाठविण्याचे आंदोलन सुरूच होते. आंदोलनाबाबत केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला. महासंघाची राष्ट्रीय कोअर कमिटीची बैठक आज (ता.५) दिल्लीत होत असून, आंदोलनाची पुढील भूमिका निश्‍चित केली जाणार आहे. 

राष्ट्रीय किसान महासंघाने देशात १ ते १० जून असा शेतकरी संप पुकारला आहे. यात देशभरातील सातपेक्षा अधिक राज्य आणि १७२ संघटना सहभागी झाल्या आहेत. आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून, शेतकऱ्यांनी दूध, भाजीपाला रोखल्याने देशातील अनेक शहरांत ३० ते ५० टक्के तुटवडा भासत आहे. पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेशात आंदोलनाचे लोन अधिक आहे. 

कायगावात चक्‍काजाम
औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी (ता. ४) औरंगाबाद-पुणे मार्गावरील कायगाव टोका येथे गंगापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी तब्बल दोन तास चक्‍काजाम आंदोलन केले. यामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाल्याने या मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

माझा अांदोलनाला पाठिंबा
देशभरातील शेतकरी गेली चार वर्षे होरपळत असताना, मोदी सरकार मात्र कोणतीही ठोस उपाययोजना करत नाही. या संतापानेच देशभरातला शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे सर्व समाजघटाकांनी जात, पात, धर्म, पंथ बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, शेतकरी म्हणून माझा या आंदोलनाला पाठिंबा आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे केले. 

आंदोलनकर्त्या शेतकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू
नागपूर : दुधाला अधिक भाव मिळावा, यासह अन्य विविध मागण्यांसाठी नागपुरात आंदोलन करताना एका शेतकऱ्याचा हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. शरद खेडीकर (वय ४५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. नागपुरात जय जवान, जय किसान संघटनेच्या नेतृत्वात हे आंदोलन सोमवारी (ता.४) सकाळी आयोजित केले होते. या वेळी शेतकऱ्यांनी दूध रस्त्यांवर फेकून केंद्र सरकारचा निषेध केला.

संघर्ष समितीचे अाज तूर, दूध भेट आंदोलन
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांसह शेतकरी संघर्ष समिती आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती यांनी स्वतंत्रपणे आंदोलन सुरू ठेवले आहे. आज (ता.५) मोझॅम्बीकची तूर, पाकिस्तानची साखर आणि गुजरात कर्नाटकचे दूध प्रत्येक तालुक्यातून तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट पाठविण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे. सरकारच्या या शेतकरीविरोधी धोरणांच्या विरोधात ५ जून ते ९ जून या काळात हा कृती कार्यक्रम करण्याचे ठरवीत आहोत. १० जून रोजी संपूर्ण राज्यभर रास्ता रोको करून चक्काजाम आंदोलन करण्याची हाक या सर्व समविचारी शेतकरी संघटनांनी दिली आहे.

चर्चेसाठी दार खुले : खोत
शेतकरी संप आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सजग आहे. मुख्यमंत्री चर्चेसाठी तयार आहेत. आंदाेलनकर्त्यांनी चर्चेसाठी यावे, मंत्रालयाचे दार त्यांच्यासाठी खुले आहे.

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...