कोथिंबीर
कोथिंबीर

नगरमध्ये कोथिंबीर शेकडा ३०० ते ५०० रुपये

नगर ः नगर बाजार समितीत आठवडाभरात आठ हजार सहाशे ९० कोथिंबीर जुड्याची आवक झाली. शंभर जुड्याला सरासरी तीनशे ते पाचशे रुपयाचा दर मिळाला. भुसारमध्ये गव्हाची सर्वाधिक ३९० क्विंटलची आवक होऊन गव्हाला १६७५ ते १७५१ रुपयाचा दर मिळाला. नगर बाजार समितीत ज्वारीची १५९ क्विंटलची आवक होऊन १३०० ते २००, हरभऱ्याची १०८ क्विंटलची आवक होऊन ३२०० ते ३३००, लाल मिरचीची १०३ क्विंटलची आवक होऊन ६७६० ते १०१८५, चिंचेची ३ हजार ८२५ क्विटंलची आवक होऊन ९५३० ते १८००१ दर मिळाला. सोयाबीनची ३०९ क्विंटलची आवक होऊन ३१०० ते ३५००, तर मकाची ६७ क्विंटलची आवक होऊन ११०० ते ११५०, रुपयाचा दर मिळाला. गुळडागाची १८९२ क्विंटलची आवक होऊन २४५० ते ३०००, रुपयाचा दर मिळाला तर चिंचोक्‍याचे १४१ क्विंटलची आवक होऊन १६४१ रुपयांचा दर मिळाला. भाजीपाल्यात टोमॅटोची ५१२ क्विंटल, वांगीची ८८ क्विंटल, फ्लावरची ४०८ व कोबीची ४०२ क्विंटलची आवक झाली. टोमॅटोला १०० ते ४००, वांगीला २०० ते १२००, फ्लावरला २०० ते ८०० रुपये कोबीला दर मिळाला. काकडीची ४९१ क्विंटलची आवक होऊन २०० ते १००० दर मिलाला तर गवारची ५२ क्विंटलची आवक होऊन ३००० ते ७००० दर मिळाला. भेंडीची १७६ क्विंटलची आवक होऊन १००० ते २५०० दर मिळाला. बटाटेची ६२० क्विंटलची आवक होऊन ५०० ते १२०० दर मिळाला. हिरव्या मिरचीची ९५८ क्विंटलची आवक होऊन १००० ते ३२०० रुपये तर गाजराची १४५ क्विंटलची आवक होऊन २०० ते ८०० रुपये दर मिळाला. मेथीच्या ८६९० जुड्याची आवक झाली. शंभर जुड्याला ३०० ते ५०० दर मिळाला. कोथिंबिरीच्या ७५०० जुड्याची आवक होऊन ३०० ते ५००, पालकच्या ४५०० जुड्याची आवक होऊन १०० ते ३००, करडी भाजीच्या ३०५० जुड्याची आवक होऊन १०० ते ३०० तर शेपूच्या २५५० जुड्याची आवक होऊन ३०० ते ५०० रुपयाचा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com