agriculture news in Marathi, coriander and frnugreek arrival increased in pune, Maharashtra | Agrowon

पुण्यात कोथिंबीर, मेथीच्या आवकेत वाढ
टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ५) भाजीपाल्याची सुमारे १५० ते १६० ट्रकची अवघी आवक झाली हाेती. लांबलेल्या पावसामुळे भाजीपाल्यांच्या झालेल्या नुकसानीनंतर रब्बी हंगामातील भाजीपाल्याचे उत्पादन सुरू झाले असून, विविध भाजीपाल्यांच्या आवकेत वाढ हाेण्यास सुरवात झाली आहे.

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ५) भाजीपाल्याची सुमारे १५० ते १६० ट्रकची अवघी आवक झाली हाेती. लांबलेल्या पावसामुळे भाजीपाल्यांच्या झालेल्या नुकसानीनंतर रब्बी हंगामातील भाजीपाल्याचे उत्पादन सुरू झाले असून, विविध भाजीपाल्यांच्या आवकेत वाढ हाेण्यास सुरवात झाली आहे.

यामध्ये प्रामुख्याने पालेभाज्यांचा समावेश असून, काेथिंबीर आणि मेथीसह प्रमुख पालेभाज्यांच्या आवकेत वाढ झाली आहे. आवकेमध्ये काेथिंबिरीची सुमारे २ लाख, तर मेथीची ७५ हजार जुड्यांची आवक झाली आहे. तर विविध फळभाज्यांच्या आवकेत वाढ झाली असली तरी मागणी असल्याने दर स्थिर हाेते. तर फळांमध्ये संत्र्यांचा आणि फळभाज्यांमध्ये राजस्थान गाजरांचा हंगाम सुरू झाला आहे.

भाजीपाल्यांच्या प्रमुख आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात येथून सुमारे १५ टेंपाे हिरवी मिरची, कर्नाटक आणि गुजरात येथून ५ ट्रक काेबी, हिमाचल येथून मटार ३ टेंपाे मटार, आंध्र प्रदेशातून शेवगा सुमारे ३ टेंपाे, बंगलाेर येथून दाेन टेंपाे आले, तसेच मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसूण सुमारे अडीच हजार गोणी, तर आग्रा, इंदूर, गुजरात आणि तळेगाव येथून बटाट्याची सुमारे ४० ट्रक आवक झाली हाेती. राजस्थान गाजराचा हंगाम सुरू झाला असून, राजस्थान येथून गाजराची एक ट्रक आवक झाली.

स्थानिक विभागातील आवकेमध्ये सातारी आले सुमारे एक हजार गाेणी, टोमॅटो सुमारे ५ हजार क्रेट्स, कोबी २०, तर फ्लाॅवर १६ टेंपाे, सिमला मिरची १० टेंपाे, तांबडा भाेपळा १० टेंपाे, भेंडी आणि गवार प्रत्येकी १०, तर गाजर सुमारे १०० गाेणी, हिरवी मिरची ६ टेंपाे, तर नवीन कांदा सुमारे ४०, तर जुना ५० ट्रक आवक झाली हाेती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : नवीन ३००-३२०, जुना ३२०-३८०, बटाटा : ७०-१००, लसूण : ३००-४५०, आले सातारी : २५०-२६०, भेंडी : २५०-३५०, गवार : गावरान व सुरती - ४००-५००, टोमॅटो : ३००-४००, दोडका : ३०० - ४००, हिरवी मिरची : २५०-३५०, दुधी भोपळा : ८०-१४०, चवळी : २००-२५०, काकडी : १२०-१६०, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी : २००-२२०, पापडी : ३००-४००, पडवळ : २८०-३००, फ्लॉवर : १४०-१८०, कोबी : २००-२८०, वांगी : ३००-५००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १५०-२००, ढोबळी मिरची : ४००-४५०, तोंडली : कळी २८०-३००, जाड : १२०-१४०, शेवगा : ९०० - १०००, गाजर : स्थानिक ५००-६००, राजस्थान ३५०-६५०, वालवर : ३००-३५०, बीट : २५०-३५०, घेवडा : ४५०-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २००-२५०, मटार : परराज्य : ८००-९५०, पावटा : ६००, तांबडा भोपळा : ८०-१२०, भुइमूग शेंग ३००-३५०, सुरण : २८०-३००, मका कणीस : ५०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव
पालेभाज्यांमध्ये काेथिंबिरीची सुमारे दाेन लाख, तर मेथीची सुमारे ७५ हजार जुड्या आवक झाली हाेती.
कोथिंबीर : ८००-१२००, मेथी : ८००-१२००, शेपू : १२००-१६००, कांदापात : १०००-१५००, चाकवत : ५००-६००, करडई : ५०० - ६००, पुदिना : ५००-७००, अंबाडी : ५००-७००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ५००-७००, चुका : १०००-१५००, चवळई : १०००-१२००, पालक : ६००-८००

फळबाजार
फळ बाजारात लिंबाची सुमारे ६ हजार गाेणी आवक झाली हाेती. माेसंबी सुमारे ८० टन, संत्रा सुमारे १५ टन, सीताफळ १० टन, डाळिंब सुमारे ८० टन, कलिंगड सुमारे १५ टेंपाे, खरबूज सुमारे ५ टेंपाे, पपई सुमारे २० टेंपाे, चिकू सुमारे एक हजार बॉक्स, पेरू सुमारे ८०० क्रेटची आवक झाली हाेती. तर विविध बाेरांची सुमारे ६०० गाेणी आवक झाली हाेती.
फळांचे दर पुढीलप्रमाणे
लिंबे (प्रति गोणी) : ५०-२००, मोसंबी : (३ डझन) : १६०-२६०, (४ डझन ) : १००-१६०, संत्रा (३ डझन) २२०-३५०, (४ डझन) : ९०-१६०, सीताफळ : १०-१२५, (प्रति किलोस) डाळिंब : भगवा : ४०-१५०, गणेश २०-६०, आरक्ता १०-४०, कलिंगड ५-१२, खरबूज १०-३०, पपई ५-२० चिकू : १००-५०० (१० किलाे), पेरू (२० किलो) : ४००-७००, बाेर (१० किलाेचे दर) ः चेकनट ४५०-५५०, चण्यामण्या ४५०-५५०, चमेली १८०-२१०, उमराण ८०-१००.

फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-३०, गुलछडी : ३०-६०, कापरी : १०-४०, शेवंती : २०-४०, ॲस्टर : १०-१६, गुलाब गड्डी (गड्डीचे भाव) : ८-१५, ग्लॅडिएटर : ८-१५, गुलछडी काडी : १०-३०, डच गुलाब (२० नग) : ५०-१००, लिली बंडल : ३-६, जरबेरा : २०-३०, कार्नेशियन : ५०-१५०, अबोली लड : २००-२५०.

मटण मासळी
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. ५) खोल समुद्रातील मासळींची सुमारे १४ टन, खाडीची सुमारे ५०० किलो, आणि नदीतील मासळीची सुमारे ७०० किलाे आवक झाली हाेती. तर आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळींची सुमारे १५ टन आवक झाली हाेती. मासळीच्या आवकेबराेबर मागणी वाढल्याने दर स्थिर हाेते.
भाव (प्रतिकिलो)
पापलेट

कापरी ः १५००, माेठे ः १४००, मध्यम ः ९००, लहान ः ६००, भिला ः ४००, हलवा ः ४४०, सुरमई ः ४४०, रावस लहान ः ४४०, मोठा ः ६००, घोळ ः ५५०, करली ः २८०, करंदी ( सोललेली ) ः २००, भिंग ः २००, पाला : ६००-१२००, वाम ः पिवळी २८०-४००, काळी २४०, ओले बोंबील ः १००.

कोळंबी
लहान : २००, मोठी :४२०, जंबो प्रॉन्स : १४५०, किंग प्रॉन्स ः ८५०, लॉबस्टर ः १५००, मोरी : २००, मांदेली : १००, राणीमासा : १४०, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ४००

खाडीची मासळी
सौंदाळे ः २००, खापी ः १८०, नगली ः२४०- ४८०, तांबोशी ः ३६०, पालू ः २००, लेपा ः १२०-२००, शेवटे : २००, बांगडा : १००-१६०, पेडवी ः ६०, बेळुंजी ः १००, तिसऱ्या : १६०, खुबे : १२०, तारली : १००.

नदीची मासळी
रहू ः १६०, कतला ः १८०, मरळ ः ३६०, शिवडा : १४०, चिलापी : ६०, मांगूर : १४०, खवली : १६०, आम्ळी ः ६०, खेकडे ः १६० वाम ः ४००

मटण :
बोकडाचे : ४४०, बोल्हाईचे ः ४४०, खिमा ः ४४०, कलेजी : ४८०.

चिकन
चिकन ः १४०, लेगपीस : १७०, जिवंत कोंबडी : ११०, बोनलेस : २४०.

अंडी
थंडीमुळे अंड्यांच्या मागणीत वाढ झाली असून, दर देखील वाढले आहेत. गावरान अंड्यात शेकड्याला ४५, तर इंग्लिशमध्ये शेकड्याला ५० रुपयांनी वाढ झाली आहे.
गावरान
शेकडा : ६९०, डझन : ९०, प्रति नग : ७.५०
इंग्लिश शेकडा : ४९५, डझन : ६६, प्रतिनग : ५,.५०

इतर ताज्या घडामोडी
स्मार्ट अचिव्हर्स योजनेचे विदर्भातील...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
स्मार्ट अचिव्हर्स योजनेचे वऱ्हाडमधील...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
वरुड येथे दूध दरप्रश्नी `स्वाभिमानी`चे...अमरावती   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध...
स्मार्ट अचिव्हर्स योजनेतील सहावे बक्षिस...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
नाबार्ड पाच हजार `एफपीओं`चे उद्दिष्ट...``नाबार्डने शेतकरी उत्पादक संघ (एफपीओ) स्थापन...
अन्य सस्तनापेक्षा उंदराची विचार...दृष्टी किंवा दृश्यावर आधारीत समस्या सोडविण्यासाठी...
आंदोलन होणार असेल तर, आमचेही कार्यकर्ते...नाशिक : दुधाला दरवाढ दिली असून दूध संघांनी...
पशुखाद्याद्वारेही विषारी घटक शिरताहेत...पर्यावरणामध्ये वाढत असलेल्या सेंद्रिय प्रदूषक...
कोय, भेट पद्धतीने फळझाडांचे कलमीकरणआंब्याची अभिवृद्धी कोय कलम, पाचर कलमांद्वारे केली...
सातत्याने हेडर्स ठरू शकतात मेंदूसाठी...सध्या विश्वचषकामुळे फुटबॉलचा ज्वर सर्वत्र पसरलेला...
शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर कामगंध...जळगाव : बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी...
दारणा धरण ५०, तर पुनंद १०० टक्के भरलेइगतपुरी, जि. नाशिक  :  इगतपुरी...
मुंबईला एक थेंबही दूध जाऊ देणार नाहीनाशिक : दुधाला ठरवून दिलेला दर मिळत नसल्याने...
सोलापूर बाजार समिती पदाधिकारी निवड...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
वीज वितरण यंत्रणा दुरुस्तीसाठी ७५००...नागपूर   : राज्यातील वीज वितरण करणाऱ्या...
परभणीतील पीकविमा परतावाप्रश्नी ठोस...परभणी : पीकविमा परतावाप्रश्नी ठोस तोडगा निघत...
किसान सभा,शेतकरी संघर्ष समितीचा दूध...नाशिक  : दुधाला किमान २७ रुपये भाव द्यावा,...
मंत्री जानकर यांची दूध दरवाढीत एजंटशिप...कऱ्हाड, जि. सातारा : दुग्ध विकास व...
पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची...पुणे  : पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रांमध्ये...
कपाशी नुकसानीपोटी मराठवाड्यासाठी ४०७...औरंगाबाद  : गुलाबी बोंड अळीच्या...