agriculture news in Marathi, coriander, fenaugreek and Shefu rate increased in solapur, Maharashtra | Agrowon

सोलापुरात कोथिंबीर, मेथी, शेपूचे दर वधारले
सुदर्शन सुतार
मंगळवार, 10 एप्रिल 2018

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबीर, मेथी, शेपूची आवक कमीच राहिली. आवक कमी असली, तरी मागणी वाढल्याने भाज्यांचे दर काहीसे वधारल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबीर, मेथी, शेपूची आवक कमीच राहिली. आवक कमी असली, तरी मागणी वाढल्याने भाज्यांचे दर काहीसे वधारल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबीर, मेथीची रोज साधारपणे पाच ते सहा हजार पेंढ्या आणि शेपूची ३ हजार पेंढ्यांपर्यंत आवक राहिली. भाज्यांची सगळी आवक स्थानिक भागातून झाली. या आधीच्या सप्ताहाच्या तुलनेत आवकेत जवळपास निम्म्याने घट झाली. शिवाय गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली होती. पण या सप्ताहात भाज्यांना मागणी वाढली. विशेषतः मेथी, शेपूला चांगला उठाव मिळाला.

मेथीला शंभर पेंढ्यांसाठी ७०० ते १००० रुपये, कोथिंबिरीला ५०० ते ७०० रुपये आणि शेपूला ४०० ते ५०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय वांगी, ढोबळी मिरची यांच्या दरात काहीशी सुधारणा झाली. त्यांची आवक मात्र रोज ५० ते २०० क्विंटलपर्यंत राहिली. वांग्याला प्रतिदहा किलोसाठी किमान ६० ते १०० रुपये आणि ढोबळी मिरचीला ८० ते १३० रुपये असा दर मिळाला.

गवार, भेंडी आणि हिरव्या मिरचीच्या दरातील तेजी या सप्ताहातही पुन्हा कायम राहिली. गवारला प्रतिदहा किलोसाठी २०० ते ३५० रुपये, भेंडीला १५० ते ३०० रुपये आणि हिरव्या मिरचीला १८० ते २०० रुपये असा दर मिळाला. कांद्याचे दर पुन्हा जैसे थे राहिले. कांद्याची आवकही घटली. कांद्याची रोज ५० ते ८० गाड्यांपर्यंत आवक होती. कांद्याला प्रतिक्विंटल १०० ते ८०० व सरासरी ५५० रुपये असा दर मिळाला.

द्राक्षाला पेटीला सर्वाधिक ७० रुपये
द्राक्षाची आवक या सप्ताहात काहीशी कमी झाली; पण मागणीमुळे या आधीच्या सप्ताहाच्या तुलनेत दर मात्र काहीसे टिकून राहिले. द्राक्षाच्या चार किलोच्या २०० ते ३०० पेट्या रोज आवक होती. मुख्यतः पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर भागातून ही आवक झाली. द्राक्षाला चार किलोच्या पेटीला ४० ते ७० व सरासरी ५५ रुपये असा दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...
रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम...
काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा...मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील...
आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारीमुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी...
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...