agriculture news in Marathi, coriander rates risen in nashik, Maharashtra | Agrowon

नाशिकमध्ये कोथिंबिरीला मागणी वाढली
ज्ञानेश उगले
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

आवक कमी आणि दिवाळीमध्ये वाढलेली मागणी  यामुळे कोथिंबिरीला गत सप्ताहात तेजीचे दर मिळाले. नाशिक भागातील पालेभाज्यांचे पावसाने नुकसान झाले आहे. या स्थितीत येत्या आठवड्यातही फार मोठी आवक होण्याची शक्यता नाही. या स्थितीत येत्या सप्ताहातही कोथिंबोरीला चांगले दर राहतील असे दिसते.
- चंद्रकांत निकम, अडतदार, संचालक, नाशिक बाजार समिती.

नाशिक : नाशिक बाजार समितीत गत सप्ताहात दिवाळीचा उत्साह असल्याने कोथिंबिरीला प्रति शेकडा २००० ते २७,००० व सरासरी १५,००० रुपये दर मिळाले. यावेळी आवक अवघी ८,००० जुड्यांची राहिली. पावसाच्या तडाख्याने पालेभाज्यांचे नुकसान झाले. दिवाळीत मागणी वाढली मात्र आवकच अत्यल्प झाली. परिणामी कोथिंबिरीला शेकडा २७ हजारपर्यंतचे तेजीचे दर मिळाले. या हंगामातील हे उच्चांकी दर असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

गेल्या पंधरवड्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले असून, त्यामुळे दिवाळीच्या कालावधीत कोथिंबिरीच्या बाजारभावाने उच्चांक गाठला. शनिवारी (ता.२१) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर २० हजार रुपये शेकडा दराने विक्री झाली. मात्र रविवारी (ता. २२) आजवरच्या दरांमध्ये सर्वांत उच्चांकी म्हणजे २७ हजार ५११ रुपये शेकडा जुडी असा भाव मिळाला आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने शेतातील उभे पीक नष्ट झाले आहे.

पावसाचा सर्वाधिक फटका कोथिंबीरच्या उत्पादनाला बसला आहे. त्यामुळे नाशिक बाजार समितीत आवक घटली आहे. त्याचा परिणाम बाजारभावावर झाला. गुरुवारी (ता. १९) कोथिंबिरीची १८ हजार रु पये शेकडा दराने विक्री झाली होती, तर शुक्रवारी दर तेजीतच असल्याने १९ हजार रुपये शेकडा दर मिळाला होता.

शनिवारी (ता.२१) कोथिंबीर बाजारभावाने चालू वर्षाचा उच्चांक मोडला. शनिवारच्या दिवशी कोथिंबीर तब्बल २० हजार रुपये शेकडा म्हणजेच २०० रुपये प्रतिजुडी दराने विक्री झाली. इतरवेळी साठ ते सत्तर हजार कोथिंबीर जुडीची आवक व्हायची तेथे आता सात ते आठ हजार जुड्यांची आवक झाली. 

नाशिक बाजार समितीत दिंडोरी, कळवण तसेच सिन्नर तालुका व जवळपासच्या आदिवासी भागांतून आवक होत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सिन्नर तालुक्यातील ठाणगाव पाडळी येथील शेतकरी दुर्गेश रेवगडे यांनी शिवांजली व्हेजिटेबल कंपनीत आणलेली कोथिंबीर छोटू चव्हाण या व्यापायाने २० हजार रुपये शेकडा दराने खरेदी केली. 

इतर ताज्या घडामोडी
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...
सातारा जिल्ह्यातील पश्‍चिम भागात दमदार...सातारा : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील महाबळेश्वर,...
कोल्हापुरात पंधरा लाख लिटर दुधाचे संकलन...कोल्हापूर ः गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये...
बीड जिल्ह्यात दुधाचे संकलन ठप्पबीड : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...