agriculture news in marathi, corinder rates decresed, nashik, maharashtra | Agrowon

दर पडल्याने कोथिंबीर दिली नाशिक बाजारातच सोडून
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 डिसेंबर 2017
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. ७) सायंकाळी कोथिंबिरीची मोठ्या प्रमाणात आवक होऊन दर कोसळले. परिणामी शेतकऱ्यांना कोथिंबीर तशीच बाजारातच सोडून घरी परतावे लागले. काही शेतकऱ्यांनी आणलेली कोथिंबीर पुन्हा वाहनात भरून आपल्या जनावरांसाठी नेली. लिलावात कोथिंबिरीला अवघा एक रुपया जुडी असा भाव मिळाला.
 
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. ७) सायंकाळी कोथिंबिरीची मोठ्या प्रमाणात आवक होऊन दर कोसळले. परिणामी शेतकऱ्यांना कोथिंबीर तशीच बाजारातच सोडून घरी परतावे लागले. काही शेतकऱ्यांनी आणलेली कोथिंबीर पुन्हा वाहनात भरून आपल्या जनावरांसाठी नेली. लिलावात कोथिंबिरीला अवघा एक रुपया जुडी असा भाव मिळाला.
 
दोन दिवसांपूर्वी झालेल्या ओखी वादळामुळे मुंबईत शेतीमालाला उठाव नसल्याने त्याचा परिणाम दरावर झाला होता. मंगळवारी सकाळपासून ढगाळ हवामान व त्यातच पावसाने हजेरी लावली होती. दिवसभर पावसाचे वातावरण असल्याने मंगळवारी शेतीमालाला कमी प्रमाणात उठाव असल्याने नाशिक बाजार समितीत दर घसरलेले होते.
 
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबई शहर, तसेच उपनगरांत दैनंदिन मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांची निर्यात केली जात असते. मंगळवारी सायंकाळी मेथी भाजी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झालेली होती, परंतु मुंबईला पाऊस असल्याने तसेच शेतीमालाला उठाव नसल्याने मेथीला अपेक्षित दर मिळाला नाही. सध्या पालेभाज्या पिकासाठी पोषक हवामान तयार आहे. त्यामुळे कोथिंबिरीची आवक वाढली आहे.
काही दिवसांपूर्वी सुमारे २७५ रुपये असा विक्रमी बाजारभाव गाठून सर्वसामान्य ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या कोथिंबिरीचे बाजारभाव गुरुवारी पूर्णपणे घसरले.
 
चांगला बाजारभाव न मिळाल्याने कोथिंबीर उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून कोथिंबीर बाजार समितीत फेकून देत काढता पाय घेतला. नाशिकमधून मुंबईला कोथिंबीर माल रवाना करण्यात आला; मात्र पुणे, खेड, मंचर या भागांतील कोथिंबीर मुंबई बाजारात दाखल होत असल्याने, तसेच गुजरात राज्यातही स्थानिक कोथिंबीर दाखल होत असल्याने गुजरातमधील निर्यात थांबली आहे. परिणामी, उठाव कमी झाल्याने बाजारभाव कमी झाले होते.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात गवार, भेंडी, चवळीच्या दरात अल्प...पुणे : गुलटेकडी येथील बाजार समितीमध्ये रविवारी (...
मृदा आरोग्य पत्रिकावाटपात पुणे आघाडीवरपुणे : शेतकऱ्यांना जमिनीत असलेल्या अन्नद्रव्याचे...
बदलत्या वातावरणामुळे ब्रॉयलर्स मार्केट... मागणी आणि पुरवठ्यातील संतुलनामुळे अंडी आणि...
कर्जमाफीच्या यादीची दुरुस्ती सुरूचजळगाव : कर्जमाफीच्या कार्यवाहीबाबत रोजच नवीन...
एकात्मिक पीक पद्धतीत रेशीमचे स्थान अढळजालना : रेशीम उद्योगातील देशांतर्गत संधी पाहता...
शेळीपालनात शास्त्रोक्‍त पद्धतीकडे वळाजालना : शेळीपालनाला आता गोट फार्म असे आधुनिक नाव...
मक्यावरील करपा रोगाच्या जनुकांचा घेतला...मक्यावरील करपा रोगाला प्रतिकार करणाऱ्या जनुकांचा...
वृद्धापकाळातील नाजूकपणा कमी करण्यात...मध्य पूर्वेतील देशांप्रमाणे फळे, भाज्या,...
बुलडाणा जिल्ह्यात जमिनीचे आरोग्य बिघडलेबुलडाणा : विदर्भ-मराठवाडा-खानदेशला जोडणाऱ्या...
मोहराने बहरल्या काजूच्या बागासिंधुदुर्ग : डिसेंबरच्या शेवटच्या सप्ताहातील...
पुणे जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ६६४१ कामे... पुणे ः भूजलपातळी वाढविण्याच्या उद्देशाने राज्य...
सातारा जिल्ह्यात रब्बीची १०१ टक्के पेरणी सातारा ः जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची...
डाळिंबाला द्या काटेकोर पाणीडाळिंब या पिकाला पाण्याची गरज ही मुळातच खूप कमी...
सरकारला शेतकऱ्यांची नाही, उद्योगपतींची...सातारा : कृषी प्रधान देशात २२ वर्षांत १२ लाख...
माथाडी मंडळे बंद करणे हा आत्मघाती प्रकार पुणे : असंघटित कामगारांची संख्या दिवसेंदिवस...
नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पावरुन...मुंबई : नाणार (ता. राजापूर) येथील प्रस्तावित हरित...
थकीत ‘एफआरपी’ची रक्कम तत्काळ द्या :...पुणे : थकीत एफआरपीची रक्कम तत्काळ देणे, को २६५...
‘महाबीज’च्या निवडणुकीत खासदार संजय...अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या...
अधिक पाण्यामुळे द्राक्ष घडनिर्मितीवर...द्राक्ष वेलीपासून चांगल्या प्रतीच्या...
अतिरिक्त पाण्यामुळे उसाची प्रतिकारशक्ती... अधिक पाण्यामुळे जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण...