agriculture news in marathi, corn area Increase in Nandurbar district | Agrowon

नंदुरबार जिल्ह्यात मक्याच्या क्षेत्रातही वाढ
टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

नंदुरबार : जिल्ह्यात रब्बी पेरणीला गती आली आहे. थंडी वाढू लागल्याने गहू पेरणीलाही सुरवात झाली आहे. जिल्ह्यात जवळपास १९ हजार हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली असून, १३ हजार हेक्‍टरवर मक्याची लागवड झाली आहे. यंदा चारा व उत्पन्न देणारे रब्बी पीक म्हणून मक्‍याकडे शेतकरी वळले असून, मक्‍याची पेरणी अनेक भागात वाढली आहे.

जिल्ह्यात नंदुरबार, नवापूर, तळोदा व शहादा भागात रब्बीची अधिक पेरणी होते. अक्कलकुवा, धडगाव तालुके सातपुडा पर्वतात असल्याने या भागात रब्बीची फारशी पेरणी होत नाही. शहादा, तळोदा आणि नंदुरबार तालुक्‍यातील तापी काठालगतच्या भागात रब्बीची पेरणी अधिक होते.

नंदुरबार : जिल्ह्यात रब्बी पेरणीला गती आली आहे. थंडी वाढू लागल्याने गहू पेरणीलाही सुरवात झाली आहे. जिल्ह्यात जवळपास १९ हजार हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली असून, १३ हजार हेक्‍टरवर मक्याची लागवड झाली आहे. यंदा चारा व उत्पन्न देणारे रब्बी पीक म्हणून मक्‍याकडे शेतकरी वळले असून, मक्‍याची पेरणी अनेक भागात वाढली आहे.

जिल्ह्यात नंदुरबार, नवापूर, तळोदा व शहादा भागात रब्बीची अधिक पेरणी होते. अक्कलकुवा, धडगाव तालुके सातपुडा पर्वतात असल्याने या भागात रब्बीची फारशी पेरणी होत नाही. शहादा, तळोदा आणि नंदुरबार तालुक्‍यातील तापी काठालगतच्या भागात रब्बीची पेरणी अधिक होते.

अर्थातच यंदा खरिपातून फारसे हाती न आल्याने अनेक शेतकरी रब्बीबाबत आशादायी आहेत. जिल्ह्यात यंदा रब्बीची जवळपास ७८ हजार हेक्‍टरवर पेरणी अपेक्षित आहे. यातील ७० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

परतीच्या पावसामुळे पूर्व शहादा व पूर्व नंदुरबार भागात काही प्रमाणात हरभऱ्याची पेरणी झाली आहे; परंतु नंदुरबारमधील खोंडामळी, चौपाळे, रनाळे आदी भागात हवी तशी पेरणी होत नसल्याची माहिती आहे. अशीच स्थिती शहादा तालुक्‍यातील पूर्व भागात म्हणजेच कलसाडी, सारंगखेडा, बामखेडा, मोहीदे आदी भागात आहे.
शहादा तालुक्‍यातील नांदरखेडा, पुसनद, पाडळदे, धुरखेडा, म्हसावद, काथर्दा, प्रकाशा आदी भागात पिकांची स्थिती चांगली आहे. गहू, हरभरा, मका पेरणी या भागात जोमात सुरू आहे. दिवाळीनंतर पेरणी सुरू झाली. सध्या मक्‍याची पेरणीही सुरू आहे. तळोदा तालुक्‍यातील आमलाड, बोरद, प्रतापपूर आदी भागात हरभरा जोमात उगवला; पण त्यावर मर रोग आल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून येत आहेत.

नंदुरबार तालुक्‍यातील कोठली, पिंपळोद, लहान शहादे, न्याहली भागातही रब्बी पिकांची पेरणी बऱ्यापैकी झाली आहे. आता कपाशीवर बोंड अळी अधिक असल्याने कपाशी मोडून त्यावर मका, हरभरा पेरणीचे नियोजन काही कृत्रिम जलसाठा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी केले आहे.

जिल्ह्यात जवळपास १९ हजार हेक्‍टरवर हरभरा, १३ हजार हेक्‍टरवर मका, ११ हजार हेक्‍टरवर गहू, जवळपास तीन हजार हेक्‍टरवर बाजरी आणि त्यापाठोपाठ कांदा पिकाची लागवड झाली आहे. पुढील १५- २० दिवसात रब्बी पिकांची पेरणी जवळपास पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.

युरियाची मागणी
नंदुरबार जिल्ह्यातही युरियाची मागणी अधिक आहे. त्यावर उपाय म्हणून अधिकचा युरिया कृषी विभागाने राज्य शासनाकडून उपलब्ध करून घेतला आहे. रब्बी हंगामासाठी २४ हजार मेट्रिक टन युरियाचा पुरवठा लक्ष्यांक मंजूर आहे. यातील ५० टक्के पुरवठा झाल्याची माहिती मिळाली.

रब्बी पिकांमध्ये शेतकरी मका पिकाकडे वळले आहेत. हरभराही अधिक दिसून येत आहे. पुढील २० ते २२ दिवस पेरणी सुरूच राहील. गव्हाची पेरणी तापी काठावरील गावांमध्ये अधिक दिसून येईल.
- दशरत धारू पाटील, शेतकरी समशेरपूर ता. नंदुरबार.

इतर ताज्या घडामोडी
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...