agriculture news in marathi, corn procurement status in nashik | Agrowon

नाशिक जिल्ह्यात शासकीय मका खरेदी कागदावरच
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 30 नोव्हेंबर 2017
नाशिक  : तब्बल पावणेदोन महिन्यांपूर्वी मका खरेदीसाठी पुरवठा विभागाने एकूण ३६ केंद्रांना परवानगी दिली असताना त्यातील केवळ पाच केंद्रे कार्यन्वित झाली आहेत. या केंद्रांनी अद्यापपर्यंत खरेदी सुरू केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे तालुक्‍याला गोदामांची वानवा असल्याने खरेदी केलेल्या मका साठवणुकीबाबत प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
 
नाशिक  : तब्बल पावणेदोन महिन्यांपूर्वी मका खरेदीसाठी पुरवठा विभागाने एकूण ३६ केंद्रांना परवानगी दिली असताना त्यातील केवळ पाच केंद्रे कार्यन्वित झाली आहेत. या केंद्रांनी अद्यापपर्यंत खरेदी सुरू केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे तालुक्‍याला गोदामांची वानवा असल्याने खरेदी केलेल्या मका साठवणुकीबाबत प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
 
राज्य सरकारने ऑक्‍टोबर महिन्याच्या प्रारंभी भरड धान्य खरेदीअंतर्गत मका खरेदीला परवानगी दिली. ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत ती सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. त्यामुळेच मका उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सरकारच्या सूचनेनुसार पुरवठा विभागाने ७ ऑक्‍टोबरला मका खरेदी सुुरू करण्याचे निर्देश दिले होते.
 
आदिवासी तालुक्‍यात आदिवासी विकास महामंडळ, तर बिगर आदिवासी तालुक्‍यात जिल्हा फेडरेशन मार्केटिंगमार्फत खरेदी करणे अपेक्षित आहे; मात्र गेल्या पावणेदोन महिन्यांत केवळ पाच केंद्रे सुरू करण्यापलीकडे कोणतीच कार्यवाही झालेली नाही. नाशिक जिल्ह्यात सद्यःस्थितीत एकूण ३६ केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. त्यात सात आदिवासी तालुक्‍यांत २६, तर आठ बिगर आदिवासी तालुक्‍यांत १० केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत.
 
सद्यःस्थितीत कळवण तालुक्‍यातील दळवट, तिरळ, विसापूर, जमधर, तर सटाण्यातील मुल्हेर येथील केंद्रे सुरू झाली आहेत. या पाचही केंद्रांपैकी एकाही ठिकाणी मका खरेदी होत नसल्याची बाब उजेडात आली आहे.
 
तालुक्‍यांना एकीकडे मका खरेदी केंद्रे कार्यान्वित झाली नसताना दुसरीकडे प्रशासन मात्र कोंडीत सापडले आहे. कारण तालुका स्तरावर गोदामांची साठवणूक क्षमता मर्यादित असल्याने खरेदी केलेला मका ठेवायचा कुठे, असा प्रश्‍न अधिकाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळेच शासनाकडून होत नसलेली मका खरेदी व साठवणुकीवरून जिल्ह्यात सध्या पेच उभा राहिलेला असताना मका विक्री होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.
टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...