agriculture news in marathi, cost of samrudhhi expressway increased, Maharashtra | Agrowon

समृद्धी महामार्गाचा खर्च वाढता वाढे
टीम अॅग्रोवन
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

मुंबई ः फडणवीस सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या खर्चाचा आकडा वाढता वाढतच चालला आहे. सुरुवातीच्या ३६ हजार कोटींवरून अवघ्या दोनच वर्षांत हा आकडा ५५ हजार कोटींच्याही पुढे पोचला आहे. 

मुंबई ः फडणवीस सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या खर्चाचा आकडा वाढता वाढतच चालला आहे. सुरुवातीच्या ३६ हजार कोटींवरून अवघ्या दोनच वर्षांत हा आकडा ५५ हजार कोटींच्याही पुढे पोचला आहे. 

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांना जोडणारा आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तर नागपूर ही राज्याची उपराजधानी असून देशाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. हे शहरही औद्योगिकदृष्ट्या मोठी गुंतवणूक होऊन औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होत आहे. या दोन महत्त्वाच्या शहरांना समृद्धी महामार्गाने जोडल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा संतुलित व समतोल विकास अपेक्षित आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या प्रकल्पासाठी अंमलबजावणी यंत्रणा म्हणून कार्यरत आहे. महामार्गाचा विकास आणि बांधणीसाठी ॲन्यूटी आणि लँड पुलिंग मॉडेलचा अवलंब करण्यात येत आहे. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुलै २०१६ मध्ये या महामार्गाची घोषणा केली. आराखडा तयार झाला तेव्हा या प्रकल्पाचा खर्च ३६ हजार कोटी रुपये इतका होता. भूसंपादन आदी कारणांमुळे प्रकल्पाचा खर्च ३६ हजार कोटींवरून ४६ हजार कोटींवर आणि सहा महिन्यांपर्यंत ४९ हजार कोटी इतका सांगितला जात होता. या प्रकल्पाच्या मूळ आराखड्यात पुन्हा बदल करत हा संपूर्ण महामार्ग उन्नत पद्धतीचा करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाली. मात्र आता त्यात पुन्हा सहा ते सात हजार कोटी रुपयांची भर पडली असून हा आकडा आता ५५ हजार कोटींपर्यंत गेल्याचे सांगितले जाते. भूसंपादनातील विरोधामुळे प्रकल्पाचे काम सुरू होण्यास दिरंगाई होत आहे. परिणामी प्रकल्पाच्या खर्चात भरच पडत आहे. 

कसा आहे समृद्धी महामार्ग?...

  • मुंबई-नागपूर सुपर एक्स्प्रेस वे अर्थात समृद्धी महामार्ग सुमारे ७१० किलोमीटर लांबीचा महामार्ग
  • या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर १६ तासांऐवजी आठ तासांत होणार पूर्ण
  • १० जिल्हे, ३० तालुके आणि ३५४ गावांतून जाणार महामार्ग
  • नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या जिल्ह्यातून जाणार महामार्ग
  • १६ पॅकेजमध्ये होणार काम
     

आणखी खर्च वाढण्याची शक्यता
ऑक्टोबर २०१७ ला काम सुरू करून २०२० पर्यंत महामार्ग पूर्ण करण्याचा शासनाचा मानस होता. प्रत्यक्षात हा महामार्ग बांधून पूर्ण होईपर्यंत प्रकल्प खर्चात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. महामार्गासाठी आतापर्यंत बहुतांश भूसंपादन पूर्ण झाल्याचा शासनाचा दावा आहे. एकूण जमिनीपैकी ९० टक्के जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाल्याचे तर उर्वरीत दहा टक्के जमिनीच्या संपादनाची फक्त तांत्रिक प्रक्रिया शिल्लक असल्याचे सांगण्यात येते. 
 

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
पडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...
चारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...
ढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...
तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...
ब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...
दुष्काळग्रस्तांना सरसकट हेक्टरी ५० हजार...मुंबई : राज्यात यंदा १९७२ पेक्षाही भयंकर...
दूध अनुदान योजनेस ३१ जानेवारीपर्यंत...पुणे : राज्यात उत्पादित होणाऱ्या (पिशवी बंद...
आता कोठे धावे मन । तुझे चरण देखलिया...पंढरपूर, सोलापूर (प्रतिनिधी) :  आता कोठे...
मराठवाड्यात रब्बीची केवळ १९ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा दुष्काळाची छाया किती...
केळीच्या आगारातून आखातात जाणार ४००...जळगाव ः केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून...
महाकॉट ब्रॅण्डची चमक पडली फिकीजळगाव ः पूर्व विदर्भ, उत्तर मराठवाडा व खानदेशातील...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथअंबाणी (जि. सातारा) येथील सौ. सुरेखा पांडुरंग...
दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात आज...पुणे : दक्षिण भारतामध्ये असलेल्या ‘गज’...
अभ्यास अन् नियोजनातून शेती देते समाधाननाशिक शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध...
‘सीसीआय’ची कापूस खरेदी मंगळवारपासून...जळगाव : कापूस खरेदीसंबंधी जिनिंगमध्ये केंद्र...
दुष्काळ, मराठा आरक्षण अधिवेशनात गाजणारमुंबई : उद्यापासून (ता. १९) मुंबईत सुरू होत...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...