अकोलखेड-अंबोडामधील कपाशी ‘मूळकूज’ने बाधित

अकोला ः अकोलखेड-अंबोडा शिवारात कपाशीची पाहणी करताना तज्ज्ञांचे पथक.
अकोला ः अकोलखेड-अंबोडा शिवारात कपाशीची पाहणी करताना तज्ज्ञांचे पथक.

अकोला ः अकोट तालुक्यातील अकोलखेड-अंबोडा शिवारात कपाशी वाळत असल्याचा प्रकार समोर अाल्यानंतर मंगळवारी (ता. ७) कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ, कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. हा प्रकार प्रामुख्याने मूळकूज झाल्याने होत असल्याचा अहवाल देण्यात अाला अाहे. जुलै महिन्यात पडलेला पाऊस थांबताच अकोट तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आकोलखेड-आंबोडा शिवारातील कपाशीचे उभे पीक सुकणे, झाडे वाळून जाणे असे प्रकार समोर अाले अाहेत. अनेकांच्या कापूस पिकात ही समस्या उद्भवली असून, शेतकरी हवालदिल झाले अाहेत. घनश्याम बिजणे, कैलास पाटील, नारायण बायवार, सुभाष बिजणे, विष्णू धुवे, गजानन बायवार, नारायण मुंडोकार, अशोक धुवे, देविदास जांभळे, गजानन सावरकर, रितेश जांभळे, धनंजय देशमुख, विनय देशपांडे यांच्यासह इतरांच्या शेतातील कपाशीचे पीक सुकले. याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देत नुकसानभरपाईची मागणीही करण्यात अाली.   याबाबत पाहणीसाठी मंगळवारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ (कापूस) डॉ. टी. एस. राठोड, सहायक कापूस पैदासकार डॉ. एस. बी. देशमुख, सहायक वनस्पती रोग (विकृती) शास्त्रज्ञ डाॅ. व्ही. व्ही. देशमुख, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, उपविभागीय कृषी अधिकारी अशोक कंडारकर, तालुकाकृषी अधिकारी के. अार. पांडे यांनी अकोलखेड, अंबोडा शिवारात शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी दिल्या.  अकोलखेड येथील अरुणा किशोर निचळ यांच्या शेतात कपाशीचा बीटी वाण लावण्यात अालेला अाहे. या शेतात ३५ ते ४० टक्के कपाशीची झाडे मूळकुजीमुळे (रूट रॉट) बाधित झालेली दिसली.  अंबोडा गावातील पुरुषोत्तम डोहळे यांच्या १.६६ हेक्टर क्षेत्रावर बीजी टू वाण लावण्यात आलेला अाहे. त्यात ४० ते ४५ टक्के मूळकूज अाढळली. घनश्याम बिजणे यांच्या शेतात १० एकरांत कपाशीची लागवड केलेली असून, यातील पाच एकरांतील कपाशी ८५ ते ९० टक्के मूळकुजीने प्रभावित झालेली असल्याचे समितीच्या निदर्शनास अाले. असे सांगितले उपाय

  • शेतात हेक्टरी दीड ते दोन किलो या प्रमाणात ट्रायकोडर्माची अाळवणी 
  • कॉपर अाॅक्सिक्लोराईड ३० ग्रॅम तसेच स्ट्रेप्टोमायसीन २ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात टाकून अर्धा लिटर प्रतिझाड अाळवणी (ड्रेंचीग) करणे
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com