agriculture news in marathi, cotton and Maize throwing movement infront of Tehsil office | Agrowon

तहसील कार्यालयासमोर कापूस, मक्का फेकून आंदोलन
टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

सिल्लोड, जि. औरंगाबाद : गुजरातमध्ये निवडणूक डोळ्यासमोर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोनस दिला जातो. मात्र महाराष्ट्रात शेतकऱ्यावर अन्याय केला जातोय, असे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मुक्ताराम गव्हाणे, सुनील सनान्से यांच्या नेतृत्वात सोमवारी तहसील कार्यालयासमोर सोमवारी (ता.६) स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कापूस, मक्का फेकून आंदोलन केले.

सिल्लोड, जि. औरंगाबाद : गुजरातमध्ये निवडणूक डोळ्यासमोर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोनस दिला जातो. मात्र महाराष्ट्रात शेतकऱ्यावर अन्याय केला जातोय, असे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मुक्ताराम गव्हाणे, सुनील सनान्से यांच्या नेतृत्वात सोमवारी तहसील कार्यालयासमोर सोमवारी (ता.६) स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कापूस, मक्का फेकून आंदोलन केले.

या वेळी स्वाभिमानीचे संपर्कप्रमुख सुनील सनान्से यांनी सरकारवर सडकून टीका करत कापसाला ८ हजार सोयाबीनला ६००० व मक्काला ३००० रुपये किमान भाव देण्याची मागणी केली. भाव न मिळाल्यास सरकार विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

राज्य सरकारने उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव द्यावा, गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तिथे कापूस उत्पादक शेतकऱ्याला बोनस दिला जातो. पण महाराष्ट्रातका नाही? असा सवाल मारोती वराडे यांनी केला.

या वेळी स्वाभिमानीचे मुक्ताराम गव्हाणे, सतीश कळम, युवराज वराडे, भगवानसिंग राजपूत यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करून सरकारचा निषेध करत कापूस व मक्का तहसील कार्यालयासमोर फेकली.

याप्रसंगी मुक्ताराम गव्हाणे यांनी सरकारने जबाबदारीचे भान ठेवावे, सक्तीने वीजवसुली बंद करून खंडित केलेला वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली. तसेच मागण्याचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले. या वेळी स्वाभिमानीचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १०६ टीएमसी...पुणे  : जिल्ह्यातील पश्‍चिम भागात असलेल्या...
बुलडाणा, वाशीममध्ये दूध दरप्रश्‍नी...अकोला  ः दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दर...
पोषक घटकांनीयुक्त शेळीचे दूधभारतामध्ये प्रामुख्याने गायीच्या व म्हशीच्या...
मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही दूध...औरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या गेलेल्या...
कोल्हापुरात हिंसक वळणकोल्हापूर : दूध आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी...
चंद्रकांतदादांच्या आश्वासनानंतर उपोषण...परभणी  ः पीकविमा परताव्यापासून वंचित...
शेतकऱ्यांना बोंड अळीची नुकसानभरपाई...नाशिक  : गेल्या वर्षी बोंड अळीमुळे कापूस...
खानदेशात ८० टक्के पेरणी उरकलीजळगाव : खानदेशात जवळपास ८० टक्के क्षेत्रावर पेरणी...
हाँगकाँग येथे जांभळ्या रताळ्यापासून...हाँगकाँग येथील एका खासगी साखळी हॉटेल उद्योगाने...