त्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील त्यांनाच माहीत.
अॅग्रो विशेष
अमरावती ः ऑनलाइन नोंदणीसह अटी व शर्तीच्या परिणामी शासकीय खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असतानाच खासगी बाजारात कापसासह सोयाबीनच्या दरात काही अंशी तेजी आली आहे. कापसाच्या दरात ४०० ते ५०० तर सोयाबीनच्या दरात २०० ते ३०० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे.

खासगी बाजारात शनिवारी कापसाची ४७०० ते ५१०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आली. यंदाच्या हंगामात कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्याच्या परिणामी उत्पादनात सरासरी ५० ते ६० टक्के घट होईल.
या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात रुईचे दर वाढल्याने भाववाढ झाल्याचे जाणकार सांगतात. जिल्ह्यात सध्या नाफेडची सहा, तर सीसीआयची दोन अशा आठ केंद्रांवर कापूस खरेदी सुरू आहे.
मात्र खासगीत कापसाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी या केंद्राकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. या आठही केंद्रांवर गेल्या दोन महिन्यांत केवळ दोन हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. त्या तुलनेत व्यापाऱ्यांकडील खरेदी १ लाख ४५ हजार क्विंटलवर पोचली आहे.
बाजार समितीमध्ये शनिवारी सोयाबीन २४०० ते २९०० रुपये प्रतिक्विंटल विकले गेले. २०० रुपये बोनससह सोयाबीनची आधारभूत किंमत ३०५० रुपये आहे. मात्र जिल्ह्यातील दहा नाफेड केंद्रावर नॉन एफएक्यू सोयाबीन नाकारले जात आहे. आता आर्द्रता नसल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांनीदेखील दरात वाढ केली आहे.
- 1 of 287
- ››