Agriculture News in Marathi, Cotton arrivals rise in Punjab | Agrowon

पंजाबमध्ये कापसाची अावक वाढली
वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

चंडीगड ः पंजाबमधील बाजार समित्यांमध्ये कापसाची अावक वाढली अाहे. अातापर्यंत विविध ठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये ३.१९ लाख क्विंटल कापसाची अावक झाली अाहे.

दरम्यान, राज्य सरकारने नवीन कापसाची खरेदी सुरू केली अाहे. या पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी कापूस खरेदीचा नुकताच अाढावा घेतला. राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांकडून अावक होणाऱ्या संपूर्ण कापसाची प्रतिक्विंटल ४,२२० रुपये किमान अाधारभूत किमतीत (एमएसपी) खरेदी केली जाईल, असे अाश्वासन मुख्यमंत्री सिंग यांनी दिले अाहे.

चंडीगड ः पंजाबमधील बाजार समित्यांमध्ये कापसाची अावक वाढली अाहे. अातापर्यंत विविध ठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये ३.१९ लाख क्विंटल कापसाची अावक झाली अाहे.

दरम्यान, राज्य सरकारने नवीन कापसाची खरेदी सुरू केली अाहे. या पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी कापूस खरेदीचा नुकताच अाढावा घेतला. राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांकडून अावक होणाऱ्या संपूर्ण कापसाची प्रतिक्विंटल ४,२२० रुपये किमान अाधारभूत किमतीत (एमएसपी) खरेदी केली जाईल, असे अाश्वासन मुख्यमंत्री सिंग यांनी दिले अाहे.

त्यांनी कापूस खेरदीसंदर्भात कृषी विभाग तसेच बाजार समित्यांमधील अधिकाऱ्यांशीही चर्चा केली अाहे. कापूस खरेदीची प्रक्रिया सुरळीत पाडण्याचे निर्देश त्यांनी दिले अाहेत. विविध ठिकाणी असलेल्या बाजार समित्यांमध्ये कापसाची अावक वाढली अाहे. अातापर्यंत ३.१९ लाख क्विंटल कापसाची अावक झाली अाहे, अशी माहिती बाजार समिती सचिवांनी दिली अाहे.

यंदा राज्यातील कापूस उत्पादन वाढल्याचा अंदाज अाहे. यामुळे सध्या होणारी कापूस अावक गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने अधिक अाहे. सध्या बाजार समित्यांमध्ये प्रतिक्विंटल ४,२२०-४,३५० रुपये दराने कापसाची खरेदी केली जात अाहे, अशी माहिती बाजार समिती सचिवांनी मुख्यमंत्री सिंग यांना दिली अाहे.

देशातील कापूस पीकक्षेत्रात वाढ
देशात यंदा कापूस पीकक्षेत्रात वाढ झाली अाहे. यंदा १२२.५९ लाख हेक्टरवर कापूस पीक व्यापले अाहे. गेल्या वर्षी १०२.७९ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली होती. यंदा पीकक्षेत्र वाढल्याने उत्पादन वाढणार असल्याचा अंदाज अाहे. पंजाबमध्ये ३.८५ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली अाहे. गेल्या वर्षी २.५६ लाख हेक्टरवर कापूस पीकक्षेत्र होते, अशी माहिती कृषी मंत्रालयाने दिली अाहे.

पंजाबमधील कापूस क्षेत्र (लाख हेक्टरमध्ये)
वर्ष क्षेत्र
२०१७-१८ ३.८५
२०१६-१७ २.५६

स्रोत ः कापूस विकास संचालनालय, नागपूर

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
चोपडा, जळगावातून केळीचा पुरवठा वाढलाजळगाव ः जिल्ह्यात मागील आठवड्यात केळीच्या दरात...
नगरमध्ये मूग ५७६० रुपये प्रतिक्विंटलनगर ः खरिपातील मुगाचे पीक हाती आले असल्याने नगर...
केळी पीक सल्लासद्यःस्थितीत नवीन मृगबागेची केळी प्राथमिक...
सोलापुरात भाज्या वधारल्या सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हळद पिकातील कीड नियंत्रणसध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
कर्बोदके, प्रथिनांचा उत्तम स्राेत ः...प्रथिनांसाठी कडधान्य हे समीकरण जसे सर्वश्रुत आहे...
नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊसनाशिक : दुष्काळाच्या सावटाखाली सापडलेल्या मालेगाव...
इजिप्तमध्ये आढळले सर्वात जुने चीजचीज जितके जुने, तितके अधिक चांगले असे समजले जाते...
खनिज तेल उत्पादनासाठी पाणी खराब...अमेरिकेतील नैसर्गिक वायू आणि तेल उत्पादक...
निवडून येण्याची क्षमता असलेल्या...पुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवार...
पुणे जिल्हा बॅंकेकडून ६४ टक्के पीककर्ज...पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने एक...
समविचारी पक्षांशी युती करून निवडणूक...भंडारा  ः केंद्र आणि राज्यातील सरकारकडून...
मराठा आरक्षणासाठी पुण्यात चक्री उपोषण...पुणे : मराठा समाजास आरक्षण मिळावे, आंदोलनादरम्यान...
अतिवृष्टीचा अकोला जिल्ह्यात ३०००...अकोला : गेल्या अाठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा...
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा...सातारा   ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
अकोला, वाशीममधील प्रकल्पांतील...अकोला  : कमी पावसामुळे प्रकल्पांमधील...
अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात पाऊस...नगर   ः जिल्ह्यामधील अकोले तालुक्‍याच्या पश्...
पुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवकपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे...
पुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे  : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...
अौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...