चंद्रावरील कापसाचा कोंब कोमेजला...

चंद्रावरील कापसाचा कोंब कोमेजला...
चंद्रावरील कापसाचा कोंब कोमेजला...

बीजिंग : चीनने ‘चांग इ-४’ या अवकाशयानातून कापसाचे बी पाठविले होते. ते पेरल्यानंतर त्याला कोंब फुटल्याचे मंगळवारी (ता. १५) जाहीर करण्यात आले होते. मात्र, याच्या दुसऱ्याच दिवशी हे कोंब कोमेजल्याचे वृत्त आले आहे. चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत नाही, त्या भागात ‘चांग इ-४’ हे अवकाशयान चीनने काही दिवसांपूर्वी उतरविले आहे. त्या यानातून नेलेले कापूस व बटाट्याचे बी पेरण्यात आले होते. त्यापैकी कापसाला कोंब फुटले होते. चंद्रावर रात्रीचे तापमान उणे १७० अंशांपर्यंत उतरल्याने कोंब कोमेजल्याचे सांगण्यात आले. सूर्याच्या प्रकाशात कापसाची वाढ चांगली होत होती. मात्र रात्री तापमान घटल्यानंतर कोंब नष्ट झाले. चंद्रावर एक रात्र दोन आठवडे असते. या दरम्यान तेथील तापमानात मोठ्या प्रमाणात घसरते. चंद्रावर दिवसाचे तापमान १२० अंश सेल्सिअसवर पोचते. ‘चंद्रावरील वातावरणावर परिणाम नाही’ चीनच्या या प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ शाय गेंगशिन म्हणाले, ‘कापसाचा कोंब लवकरच मरेल, असा आमचा अंदाज होता. रात्रीच्या वेळी चंद्रावर कोणतेही रोप जिवंत राहणे शक्‍यच नाही. ‘चांग इ-४’ यान चंद्रावर रविवारी (ता. १२) उतरले, त्या वेळी चंद्रावर पहिली रात्र होती. त्याचदिवशी ‘चांग इ-४’ रोव्हर ‘स्लिप मोड’वर गेले. ‘चंद्रावरील कोंब व बियांचे हळूहळू विघटन होईल. यामुळे चंद्रावरील वातावरणावर काहीही परिणाम होणार नाही. चंद्रावर रोप उगवण्याचा प्रयोग आम्ही प्रथमच केला होता. चंद्रावर कशाप्रकारचे वातावरण असेल, याचा अनुभव आम्हाला नव्हता,’ असेही ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com