agriculture news in marathi, cotton Buy through auction in Parbhani district | Agrowon

परभणी जिल्ह्यात लिलावाद्वारे कापूस खरेदी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

परभणी : जिल्ह्यातील परभणी, मानवत, सेलू कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गुरुवारी (ता.९) जाहीर लिलाव पद्धतीने कापूस खरेदीस सुरवात झाली. पहिल्या दिवशी ४,३२० ते ४,५५५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले.

यावेळी सभापती समशेर वरपुडकर, उपसभापती दिलीप आवचार, संचालक सोपानराव आवचार, गणेश घाटगे, गंगाप्रसाद आणेराव, संदीप भंडारी, सचिव विलास मस्के यांच्यासह शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परभणी : जिल्ह्यातील परभणी, मानवत, सेलू कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गुरुवारी (ता.९) जाहीर लिलाव पद्धतीने कापूस खरेदीस सुरवात झाली. पहिल्या दिवशी ४,३२० ते ४,५५५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले.

यावेळी सभापती समशेर वरपुडकर, उपसभापती दिलीप आवचार, संचालक सोपानराव आवचार, गणेश घाटगे, गंगाप्रसाद आणेराव, संदीप भंडारी, सचिव विलास मस्के यांच्यासह शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पहिल्या दिवशी १५० वाहनांतून सुमारे ८०० क्विंटल कापसाची आवक झाली होती. किमान ४,३२५ रुपये तर कमाल ४,५५१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. या वेळी प्रथम कापूस विक्रीस आणणाऱ्या ११ शेतकऱ्यांचा सत्कार बाजार समितीतर्फे करण्यात आला. मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डावर गुरुवारी कापूस खरेदीस सुरवात झाली असून पहिल्या दिवशी ४,४०० ते ४,५२७ रुपये प्रतिक्विंटल दर देण्यात आला.

या वेळी सभापती गंगाधर कदम, उपसभापती पंकज आंबेगांवकर, सचिव बालासाहेब कदम, संचालक माणिकराव काळे, नारायण भिसे, गिरिश कत्रुवार, सुनील जाधव आदी उपस्थित होते. सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी लिलाव पद्धतीने कापूस खरेदीस सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी ४,३२० ते ४,४७० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

यावेळी सभापती रवींद्र डासाळकर, उपसभापती सुंदर गाडेकर, संचालक भगवान कदम, सुखानंद कटारे, राम खराबे, दत्तराव जाधव, सहाय्यक निबंधक दिलीप गौंडर आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणताना सात-बारा उतारा, पेरापत्रक, आधारकार्ड, आयएफएससी कोड नमूद केलेल्या बॅंक पासबुकची सत्यप्रत, मोबाईल क्रमांक आदीसह कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.

ई-नाम प्रणाली अंतर्गत कापूस खरेदी केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये आरटीईजीएसव्दारे पेमेंट जमा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी स्वच्छ आणि काडी कचरा विरहित कापूस विक्रीस आणावा, असे आवाहन परभणी बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.

इतर ताज्या घडामोडी
मार्चअखेरपर्यंत टप्प्याटप्याने... मंदीतील ब्रॉयलर्सचा बाजार मार्चअखेरपर्यंत...
पुण्यात लसूण, फ्लॉवर, मटार वधारलापुणे ः वाढता उन्हाळ्यामुळे शेतीमालाचे उत्पादन...
चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये...चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति...
राहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍...पुणे : सकाळ माध्यम समूहाच्या संपादक संचालकपदी...
सत्तावीस कारखान्यांकडून १ कोटी २१ लाख... नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या...
पुणे जिल्ह्यातील १०० मंडळांमध्ये... पुणे  ः हवामान अंदाजाबाबत अचूक माहिती...
लाचखोर तालुका कृषी अधिकारी 'लाचलुचपत'...अकोला : जलसंधारणाच्या केलेल्या कामांची देयके...
परभणी जिल्ह्यातील चार लघू तलाव कोरडे परभणी ः पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे...
स्वखर्चाने शेततळे करणाऱ्यांना मिळेना...औरंगाबाद : शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून...
कोल्हापुरात गुळाचे पाडव्यानिमित्त सौदे कोल्हापूर : येथील बाजार समितीत पाडव्यानिमित्त...
साखरेप्रमाणे कापसासाठी धाेरण ठरवावे :...पुणे : साखरेप्रमाणेच कापसासाठी दरावर लक्ष कें....
राज्यात आज अन्नत्याग आंदोलनमाळकोळी, नांदेड ः आजवर आत्महत्या केलेल्या...
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
परभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये... परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
औरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये औरंगाबाद  : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
पशू सल्लागोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना...
सांगलीतील द्राक्ष, बेदाणा उत्पादक ढगाळ... सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ...
जळगावमधील शेतकऱ्यांचा परदेश अभ्यास दौरा... जळगाव : परदेशातील शेतीचे तंत्रज्ञान, शेती,...