agriculture news in marathi, Cotton to cloth will be transform to sowing to sale phase | Agrowon

‘कापूस ते कापड’पासून आता ‘पिकणे ते विकणे’ शृंखला
महेंद्र महाजन ः सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

नाशिक : राज्यातील कापसावर प्रक्रिया होऊन मूल्यवर्धनाचा फायदा राज्याला व्हावा म्हणून ‘‘कापूस ते कापड’’ हे उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून सरकारने जानेवारी २०१२ मध्ये वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले. त्याअंतर्गत २० हजार कोटींची गुंतवणूक आणि ३ लाख रोजगारनिर्मिती व ४५ लाख गाठींवर प्रक्रिया करणारे उद्योग स्थापन ही फलनिष्पत्ती झाली. आता सरकारने पुढचे पाऊल टाकत ‘पिकणे ते विकणे’ ही शृंखला मजबूत करण्यासाठी २०२३ पर्यंत वस्त्रोद्योग धोरणाला पुढे चाल दिलीय.

नाशिक : राज्यातील कापसावर प्रक्रिया होऊन मूल्यवर्धनाचा फायदा राज्याला व्हावा म्हणून ‘‘कापूस ते कापड’’ हे उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून सरकारने जानेवारी २०१२ मध्ये वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले. त्याअंतर्गत २० हजार कोटींची गुंतवणूक आणि ३ लाख रोजगारनिर्मिती व ४५ लाख गाठींवर प्रक्रिया करणारे उद्योग स्थापन ही फलनिष्पत्ती झाली. आता सरकारने पुढचे पाऊल टाकत ‘पिकणे ते विकणे’ ही शृंखला मजबूत करण्यासाठी २०२३ पर्यंत वस्त्रोद्योग धोरणाला पुढे चाल दिलीय.

महाराष्ट्राच्या नवीन वस्त्रोद्योग धोरणाअंतर्गत ५ वर्षांत १० लाख रोजगारनिर्मिती आणि ३६ हजार कोटींची राज्यात गुंतवणूक अपेक्षित धरण्यात आली आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करणारी अनेक प्रोत्साहने (विशेषतः वीजदर अनुदान, अनुसूचित जाती-जमाती व अल्पसंख्याकांना भांडवली अनुदान) हे अपेक्षित गुंतवणुकीमागील सूत्र निश्‍चित करण्यात आले आहे. गारमेंट, निटिंग व होजिअरी क्षेत्रातील उद्योगांना सशक्त करण्यावर भर देण्यात आल्याने महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे सहकार-पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यात एकूण उत्पादित कापसाच्या २५ टक्के कापूस राज्यातील सूत गिरण्यांमधील प्रक्रियेसाठी जातो. उर्वरित कापूस इतर राज्यांत जातो. त्याचप्रमाणे रंग आणि प्रक्रियेसाठी कच्चे कापड इतर राज्यांत जाते. कापसाशिवाय राज्यात रेशीमनिर्मिती होते. रेशीम उद्योगात राज्यात प्रतिहेक्‍टरी ८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. रेशीम उत्पादक अपारंपरिक राज्यांमध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. वन हक्क कायद्याच्या लाभार्थ्यांना दारिद्र्यरेषेच्यावर येण्यासाठी महारेशीम अभियान उपयुक्त ठरणार आहे, असे सरकारचे म्हणणे आहे.

याशिवाय राज्यात दख्खनी मेंढीपासून वर्षाला १ हजार ४०० मेट्रिक टन लोकरीचे उत्पादन होते. मात्र लोकरीवर प्रक्रिया करणाऱ्या सुविधा नसल्याने मूल्यवर्धनाच्या लाभापासून राज्यासह मेंढीपालन करणाऱ्या समूहास वंचित राहावे लागते. त्याचवेळी राज्यात मोठ्या प्रमाणे बांबू, केळी, अंबाडी, घायपात, नारळाचे उत्पादन घेतले जाते. अशा अपारंपरिक गोष्टींपासून तंतूनिर्मिती व त्या तंतूपासून विविध उत्पादननिर्मिती होऊ शकेल. या साऱ्या बाबी विचारात घेऊन राज्यात उत्पादित होणारा कापूस, रेशीम, लोकर, अन्य अपारंपरिक तंतू आणि मानव निर्मिती तंतूवर प्रक्रिया होऊन रोजगारनिर्मिती व्हावी ही भूमिका राज्याच्या नवीन वस्त्रोद्योग धोरणामागील आहे.

आकडे बोलतात

  • वस्त्रोद्योगाचा देशातील औद्योगिक उत्पादनात १४, राष्ट्रीय सकल उत्पादनातील ४, देशाच्या एकूण निर्यातीतील १३ टक्के हिस्सा
  • देशातील वस्त्रोद्योगात ५ कोटी लोकांना मिळतोय प्रत्यक्ष रोजगार
  • जगातील वस्त्रोद्योग क्षमतेमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर
  • देशातील २०१६-१७ मधील तयार कपड्यांची बाजारपेठ अंदाजे ६ लाख कोटींची
  • तयार कपड्यासाठी घरगुती, औद्योगिक वापर आणि निर्यात अशी तीन क्षेत्रे
  • घरगुती वापर ६०, संस्थात्मक वापर २१ आणि तयार कपड्यांची निर्यात १९ टक्के

इतर अॅग्रो विशेष
शेतीतील दारिद्र्याचे भीषण वास्तवभारताने खुली व्यवस्था स्वीकारल्याला २०१६ मध्ये २५...
आश्वासक हरभरा; अस्वस्थ उत्पादकराज्यात हरभरा काढणीस महिनाभर आधीपासूनच सुरवात...
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड...सांगली  ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम...
ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द,...
कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात...वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील...
राज्यात अद्यापही २४ टक्के ‘एफआरपी’ बाकीपुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना...
उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशाननवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘...नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव...
उन्हाचा ताप वाढण्याची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा...
जेजुरी गडावर देवाची रंगपंचमीजेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...