मराठवाडयात कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव

मराठवाडयात कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव
मराठवाडयात कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव

परभणी : सलग तीन आठवडे  पावसाचा खंड आणि त्यानंतर दोन दिवस अतिवृष्टी यामुळे मराठवाडयात फुलोरा व बोंड धरण्याच्या अवस्थेत असलेल्या कपाशीवर  आकस्मिक मर रोग अढळुन येत असल्याने त्यावर वेळीच उपाययोजना करण्याचा सल्ला  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिला आहे.

नुकत्याच झालेल्या पावसानंतर अचानक कपाशीत मर रोग अढळुन येत आहे.त्याची पहाणी कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केली आहे. हा कुठला रोग नसुन कपाशीतील विकृती  आहे. सतत १५ दिवस पाण्याचा ताण पडला आणि पाणी दिले किंवा पाऊस पडला तरी मर होते. प्रखर सुर्यप्रकाश किंवा सतत ढगाळ वातावरण यामुळे ही मर दिसते. जास्त पाणी झाले तरीही मर होते. या विविध कारणांपैकी एक कारण मर येण्यासाठी पुरेसा आहे अशी माहीती 

विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.अशा परिस्थितीत कापुस पीक मुळावाटे अन्न घेवू शकत नाही. अन्नपुरवठा बंद झाल्यामुळे पीक मलूल होते व सुकल्यासारखे दिसते. यासाठी शेतकऱ्यांनी  घाबरुन न जाता साधे सोपे उपाय करावेत असा सल्ला त्यांनी दिला आहे. प्रथमत: शेतामधुन पाण्याचा निचरा करावा. जास्तीचे पाणी शेतातून काढून  टाकावे. त्यानंतर १५ ग्रॅम युरिया अधिक  १५ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश अधिक २ ग्रॅम कॉपर ऑक्झीक्लोराईड प्रति लिटर पाण्यात टाकून चांगले मिसळून घ्यावे. हे द्रावण १०० ते १५० मिली उमळलेल्या झाडाला टाकून आळवणी करावी. यामुळे पीकाला लगेच अन्नद्रव्य उपलब्ध होतील आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून बुरशीनाशकाचा वापर करावा. जसजसी वापसा होईल तसतसे पीकात सुधारणा होईल. जमिनीत हवा आणि पाण्याचे प्रमाण सारखे झाले की मुळे अन्न घ्यायला सुरुवात करतात आणि मर विकृति हळूहळू कमी होते असा सल्‍ला डॉ.आळसे यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com