agriculture news in marathi, cotton crop damage, yavatmal, maharashtra | Agrowon

कापूस नुकसानीच्या सर्वेक्षणासाठी पाठपुरावा करू
टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017
जिल्ह्यात सर्वदूर बोंड अळीचा प्रादुर्भाव कपाशीवर आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून यावर केवळ चर्चा होत असताना कारवाई होत नाही. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आर्थिक दवाबामुळे कारवाईसाठी टाळाटाळ होत असल्याचे वाटते. याप्रकारात मात्र शेतकऱ्यांचे मरण होत आहे.
- मनीष जाधव, वागद, ता. महागाव, यवतमाळ
महागाव, जि. यवतमाळ : जिल्ह्यात तसेच महागाव तालुक्‍यात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला, यामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून मदतीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन आमदार राजेंद्र नजरधने यांनी मंगळवारी (ता.८) दिले. 
 
महागाव तालुक्‍यातील मुडाणा येथील अशोक येनकर यांच्या शेताला भेट देत त्यांनी पिकाची पाहणी केली. महागाव तालुक्‍यात सर्वदूर कपाशीवर कीड-रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. बीटी कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव होणार नाही, असा दावा केला जात होता. परंतु त्यावरच या वेळी गुलाबी बोंड अळीचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला. अशोक बापूराव येनकर यांनी पाच एकरावर बीजी-२ तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असलेले कपाशी वाण लावले. 
 
एकरी २० हजार रुपयांचा आजवर खर्च झाला. परंतु उत्पादकता मिळाली अवघी एकरी एक क्‍विंटलची. यातून उत्पादकता खर्चाची भरपाई होणे शक्‍य नसल्याने त्यांची चिंता वाढली होती. आमदार नजरधने यांनी त्यांच्या शेताला भेट दिली. या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत नाईक, महागाव तालुका कृषी अधिकारी राजकुमार रणवीर उपस्थित होते. 

इतर ताज्या घडामोडी
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...