agriculture news in marathi, Cotton crop due to electricity problem | Agrowon

खानदेशात विजेच्या समस्येमुळे कापसाला फटका
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 जून 2018

जळगाव : जिल्ह्यात वादळी पावसाने दणका दिल्याने अनेक भागांत शेतपंपांना वीजपुरवठा करणारे रोहित्र, तारा यात बिघाड झाले आहेत. परिणामी, पूर्वहंगामी कापसासह केळी पिकाचे हवे तसे सिंचन करता न आल्याने या पिकांना फटका बसला आहे.

जळगाव : जिल्ह्यात वादळी पावसाने दणका दिल्याने अनेक भागांत शेतपंपांना वीजपुरवठा करणारे रोहित्र, तारा यात बिघाड झाले आहेत. परिणामी, पूर्वहंगामी कापसासह केळी पिकाचे हवे तसे सिंचन करता न आल्याने या पिकांना फटका बसला आहे.

जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवड २२ मेपासून सुरू झाली. नंतर १ जूनपासून वादळी पाऊस सुरू झाला. जिल्हाभर वादळी पावसाने धुमाकूळ घातला. त्यात केळीचे नुकसान झाले. यातच शेतपंपांना वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणांमध्ये बिघाड झाले. शेतकरी वीज कंपनीकडे दुरुस्तीसंबंधी गेले, तर त्यांच्याकडे बिलांचे पैसे मागितले गेले. वादळी पाऊस १ जून ते ६ जूनपर्यंत सुरूच होता. शेतपंप सुरूच झाले नाहीत. दुपारी ऊन पडायचे. सिंचन झाले नाही. त्यात जूनमध्ये लागवड केलेल्या कापसाचे कोवळे कोंब करपले.

अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पिकात नांग्या भरायचे काम करावे लागत आहे. दोन एकरांत एक कापूस बियाण्याचे पाकीट नांग्या भरण्यासाठी लागत आहे. त्यासाठी पाकिटावरील ७४० रुपये व मजुरीसाठी २०० रुपये, असा मिळून सुमारे ९५० रुपये खर्च येत आहे. मागील दोन दिवसांपासून सतत उष्णता आहे. ऊन तापत आहे. सिंचन करण्यासंबंधी शेतकरी शेतात जातात, पण वीजपुरवठा व्यवस्थित नसतो. जळगाव, चोपडा, यावल, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव आदी भागांत वीज कंपनीकडून दुरुस्तीची कामे गतीने झालेली नाहीत.

तुटलेल्या तारांची दुरुस्ती, तारांच्या आड येणाऱ्या वृक्षांच्या फांद्या तोडणे, रोहित्राची किरकोळ दुरुस्ती, वाकलेले खांब सरळ करणे आदी कामांसाठी शेतकऱ्यांकडून वीज कंपनीचे अधिकारी पैसे मागत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत लोकप्रतिनिधींकडे तक्रारी केल्यास तेदेखील दखल घेत नाही. वीज कंपनीचे अधिकारी आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी उपस्थित नसतात. दुपारी ते कुठेही सापडत नाहीत. अशा स्थितीत समस्या कशा मार्गी लावायच्या, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे. हा प्रश्‍न आणखी दोन दिवस तसाच रा.िहला, तर केळी व कापसाचे अतोनात नुकसान होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

वीज कंपनीने शेतपंपांचा वीजपुरवठा व्यवस्थित करावा. अन्यथा त्यांच्या विरोधात आंदोलन केले जाईल. शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा त्यांनी घेऊ नये. शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान वीज कंपनीमुळे होत आहे.
- कडूअप्पा पाटील, शेतकरी, किनगाव (जि. जळगाव)

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...