'महाकॉट'ची आठ लाख गाठींची निर्यात
चंद्रकांत जाधव
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

महाकॉटच्या कापसाला मागील हंगामात चांगली मागणी राहिली. गाठीमागे ५०० रुपये जादा दरही मिळला. या हंगामातही सकारात्मक चित्र असून, खानदेशी कापसाला चांगले दर राहतील, अशी अपेक्षा आहे. 
- प्रदीप जैन, अध्यक्ष, खानदेश जीन प्रेस कारखानदार असोसिएशन, जळगाव

जळगाव : गेल्या कापूस हंगामात ऑक्‍टोबर २०१६ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत खानदेशातील जिनर्सनी विकसित केलेल्या महाकॉट ब्रँडच्या कापूस गाठींना (१७० किलो रुईची एक गाठ) बाजारातील दरांपेक्षा ५०० रुपये जादा दर मिळाला. प्रमाणित दर्जा असल्याने तीन बहुराष्ट्रीय कंपन्यांनी या कापसाला पसंती दिली व जवळपास आठ लाख गाठींची परदेशात निर्यातही झाली. 

खानदेशसह बुलडाणा जिल्ह्यातील ८५ जिनर्सनी महाकॉट ब्रँडअंतर्गत २१ लाख गाठींची निर्मिती केली. त्याचा दर्जा आंतरराष्ट्रीय प्रमाणानुसार ठेवला. त्यामुळे गाठीतील आर्द्रता (ह्युमिडीटी) नऊ टक्‍क्‍यांपर्यंत, लांबी २९ मिलिमीटरपेक्षा अधिक व गाठीतील कचऱ्याचे प्रमाण (ट्रॅश) तीन टक्‍क्‍यांखाली ठेवले. दर्जा कायम राखल्याने निर्यातीला वाव मिळाला. तीन बहुराष्ट्रीय कंपन्यांनी या महाकॉटच्या गाठींना प्राधान्य अधिक दिले. एकट्या बांगलादेशात दोन लाख गाठींची निर्यात झाली. याशिवाय पाकिस्तान, व्हीएतनाम, इंडोनेशिया येथूनही मागणी कायम राहिली. 

८५ जिनिंग मागील हंगामात कार्यरत होत्या. त्यातील ६० जिनिंग जळगाव जिल्ह्यात सुरू होत्या. तर उर्वरित जिनिंग धुळे, नंदूरबार व बुलडाणा जिल्ह्यात महाकॉटसंबंधी काम करीत होत्या. रुईच्या खंडीला (एक खंडी ३५६ किलो रुईची) सरासरी ४२ हजार रुपये दर मिळाला. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये दर कमी होते. मार्चमध्ये दरात थोडी सुधारणा झाली होती, असे खानदेश जीन प्रेस कारखानदार असोसिएशनतर्फे सांगण्यात आले. 

सिंगापूरच्या कंपनीची पसंती
मागील महिन्यात खानदेश जीन प्रेस कारखानदार असोसिएनच्या सदस्यांनी सिंगापूर येथे कापूस कमोडिटीमध्ये कार्यरत ओलन, लुईस ड्रेफस (एलडी) या कंपन्यांच्या आशिया विभागाच्या कार्यालयांना भेट दिली. असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन, सदस्य जीवन बयस, लक्ष्मण पाटील, सुरेश चौधरी आदींनी भेट दिली.

तेथे खानदेशी कापूस, लागवड व गाठींच्या निर्मितीचे तंत्रज्ञान, दर्जा यावर सादरीकरण केले. त्याची या कंपन्यांनी प्रशंसा केली व खानदेशी कापूस गाठींना पसंती देऊ, असे आश्‍वासन दिले. लागलीच ओलन कंपनीच्या प्रतिनिधींनी खानदेशी जिनर्ससोबत मागील पंधरवड्यात औरंगाबाद येथे बैठक घेतली. खानदेशी गाठींना आपण प्राधान्य देऊ, दर्जा चांगला असून, अधिक पुरवठ्याच्या दृष्टीने नवीन हंगामातही तयारी करा, असे त्या प्रतिनिधींनी खानदेशी जिनर्सना या बैठकीत सांगितल्याची माहिती मिळाली.

इतर अॅग्रो विशेष
यशवंत सिन्हा आता शेतीसाठी आवाज उठविणारअकोला : अाज देशातील सर्व शेतकऱ्यांना समस्यांपासून...
विदर्भ, खानदेशच्या उत्तर भागांतून...पुणे : गेल्या महिन्यात सुरू झालेल्या परतीच्या...
उस लागवड तंत्रज्ञानआजची सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता पाहता ऊस...
कीटकनाशक विषबाधेचा अहवाल देणे बंधनकारकपुणे : शेतीसाठी कुठेही कीटकनाशकांची हाताळणी अथवा...
मसाला उद्याेगातून भारतीताईंनी साधला ’...काळा मसाल्यासोबत शेंगा, कारळा, जवस चटण्यांचे...
गोसंवर्धन, प्रशिक्षण हेच 'गोकुलम...नांदुरा बुद्रुक (जि. अमरावती) येथील गोकुलम...
ज्वारी चारा पीक लगवड तंत्रज्ञान ज्वारी हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पीक आहे....
यवतमाळ जिल्ह्यात शेतमजुरांची होणार...मुंबई : कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे अनेकांचा...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे ः काेकण, गाेवा, मध्य महाराष्‍ट्र व...
आधुनिक बैलगाडीमुळे होईल बैलांवरील ताण...उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संशोधक डॉ. जयदीप...
कडधान्यांच्या अायातीत वाढ !मुंबई ः कडधान्यांच्या अायातीवर केंद्र सरकारने...
बहाद्दर शेतकऱ्यांचा होणार गौरव पुणे - प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश...
खतांवरील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक... नवी दिल्ली ः खतांवरील अनुदान लाभार्थी...
मंगळवारपर्यंत पावसाची शक्‍यता, त्यानंतर...सर्व हवामान स्थिती पाहता ता. १४ ऑक्‍टोबर रोजी...
फवारणीसाठी चार हजार गावांमध्ये संरक्षण...नगर : यवतमाळ जिल्ह्यात विषबाधेमुळे झालेल्या...
पावसाळी परिस्थितीत द्राक्ष बागेचे...सध्या काही ठिकाणी द्राक्ष बागेत आगाप छाटणी झालेली...
चवळी, मारवेल, स्टायलाे चारा लागवड...चवळी :  चवळी हे द्विदल वर्गातील...
मूग, उडीद खरेदी केंद्र उद्घाटनाच्या...अकोला : शासन अादेशानुसार नोंदणी केलेल्या...
कृषी सल्ला : पिकांचे नियोजन, कीड व रोग...सद्य परिस्थितीमध्ये पिकांच्या नियोजन व कीड व...
आॅनलाइन नोंदणी अडकली नियमातकोल्हापूर : हमीभाव खरेदी केंद्राबरोबरच अन्य...