agriculture news in marathi, cotton gets 4870 to 5150 rate per quintal in akot | Agrowon

अकोटमध्ये कापसाला ४८७० ते ५१५० रुपये भाव
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

अकोला : या हंगामात कापसाला चांगला भाव मिळवून देणाऱ्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १४) ४८७० ते ५१५० दरम्यान भाव मिळाला. या हंगामात येथील बाजारात साडेपाच हजारांपेक्षा अधिक दर या बाजारात मिळाला होता.

बुधवारी अकोट बाजारात सुमारे १९२९ क्विंटल कापसाची अावक झाली होती. या बाजारात तुरीच्या अावकेत वाढ झालेली अाहे. या हंगामात लावलेली तूर विक्रीसाठी येत अाहे. बुधवारी ८२७ क्विंटल अावक होती. तुरीला कमीत कमी ३८५५ व जास्तीत जास्त ४३२० रुपये भाव भेटला. 

अकोला : या हंगामात कापसाला चांगला भाव मिळवून देणाऱ्या अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १४) ४८७० ते ५१५० दरम्यान भाव मिळाला. या हंगामात येथील बाजारात साडेपाच हजारांपेक्षा अधिक दर या बाजारात मिळाला होता.

बुधवारी अकोट बाजारात सुमारे १९२९ क्विंटल कापसाची अावक झाली होती. या बाजारात तुरीच्या अावकेत वाढ झालेली अाहे. या हंगामात लावलेली तूर विक्रीसाठी येत अाहे. बुधवारी ८२७ क्विंटल अावक होती. तुरीला कमीत कमी ३८५५ व जास्तीत जास्त ४३२० रुपये भाव भेटला. 

हरभऱ्याची ९७५ क्विंटल अावक झाली होती. ३४४० ते ३८०० दरम्यान हरभरा विकल्या गेला. बुधवारी या ठिकाणी अोव्या (अजवान)ची २२ क्विंटल अावक झालेली होती. या हंगामातील अोव्याला ४०५५ ते ६६०० रुपये दर मिळाला. सोयाबीनलासुद्धा ३१४० ते ३५७५ असा चांगला दर मिळाला. गेले तीन-चार दिवस या भागात ढगाळ वातावरण बनलेले होते. बुधवारी वातावरणात चांगले होताच बाजारात अावक वधारली. तरीही सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, गहू या धान्याची अावक तितकीशी नव्हती. कापसाची अावक चांगली राहल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात अाले. येत्या काळात या धान्याची अावक पूर्वपदावर येण्याची शक्यता वर्तविल्या गेली.   

इतर ताज्या घडामोडी
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...