agriculture news in Marathi, cotton growers attract towards sugarcane in Khandesh, Maharashtra | Agrowon

खानदेशात कापूस उत्पादकांचा कल उसाकडे !
चंद्रकांत जाधव
बुधवार, 3 जानेवारी 2018

कपाशीचे क्षेत्र घटेल की नाही हे सांगता येणार नाही, परंतु कृषी विभाग पुढील हंगामासाठीदेखील सरासरी लागवड क्षेत्र लक्षात घेऊन कपाशी बियाण्याची मागणी करील. जळगावात राज्यात सर्वाधिक कापूस लागवड होते. त्यात पूर्वहंमगामी कपाशीही बऱ्यापैकी असते. 
- मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जळगाव

जळगाव ः कपाशीचे पीक आतबट्ट्याचे ठरत असल्याने धुळ्यासह जळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकरी ऊस व लिंबूवर्गीय पिकांकडे वळले आहेत. कपाशीखालील क्षेत्र खानदेशात पुढील हंगामात मिळून सुमारे अडीच लाख हेक्‍टरने घटू शकते. यामुळे कपाशी बियाणे व खतांच्या बाजारातील उलाढालही सात ते आठ कोटींनी कमी होईल, अशी शक्‍यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

यंदा कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रकोप एवढा झाला की पूर्वहंगामी कपाशीचे उत्पादन एकरी पाच क्विंटलही जेमतेम आले. तर कोरडवाहू कपाशीत ५० किलोही उत्पादन एकरी हाती आले नाही. पुढील वर्षीही कपाशीबाबत अशीच स्थिती राहील की काय म्हणून ज्या शेतकऱ्यांकडे पुरेसा जलसाठा किंवा कृत्रीम जलसाठे मुबलक आहेत त्यांनी ऊस व लिंबूवर्गीय पीक लागवड सुरू केली आहे. 

धुळ्यात नेर, कुसुंबा या जलसाठे मुबलक असलेल्या भागात ऊस लागवड सुरू आहे. धुळे तालुक्‍यातील कापडणे, न्याहळोद भागात कांदा लागवड पद्धतीत बदल करून गादी वाफे व मल्चिंग, ठिबकचा वापर सुरू झाला आहे. कमी पाण्यात पुढेही कपाशीऐवजी कमी कालावधीचे पीक घेण्याचा प्रयत्न या भागात आहे. तर शिरपुरातही ऊस लागवड जोमात सुरू आहे.

शिरपुरातील तरडी, बभळाज, होळनांथे, जापोरा, अर्थे, तऱ्हाडी आदी भागात ऊस लागवड वाढेल, असे सांगण्यात आले. तापी व गिरणा काठावरील गावांमध्ये लिंबूर्गीय पिकांसह कमी कालावधीची कांदा, भाजीपाला पिके घेण्यासाठी शेतकरी सरसावले आहेत. जळगाव, भडगाव भागात लिंबू, सीताफळ आदी फळबागांकडे काही शेतकरी वळले आहेत. जळगाव जिल्ह्यात उसाचे क्षेत्र ११ हजार हेक्‍टर एवढे होते. त्यात यंदा सुमारे तीन ते चार हजार हेक्‍टरने वाढ होण्याची शक्‍यता आहे.

बियाणे बाजाराला फटका शक्‍य
अनेक कपाशी घेणारे शेतकरी अधिक व कमी कालावधीच्या पिकांकडे वळल्याने पुढे कपाशीखालील क्षेत्र कमी होईल. कपाशी बियाण्याची गरजही क्षेत्र कमी होणार असल्याने सुमारे ११ लाख पाकिटांनी कमी होईल. परिणामी कपाशी व खतांच्या बाजारातील उलाढालही अंदाजित सात ते आठ कोटींनी कमी होईल.

असे आहेत अंदाज...
खानदेशातील कपाशीखालील क्षेत्र (आकडे हेक्‍टरमध्ये)

२०१७-१८---२०१८-१९
आठ लाख---साडेपाच लाख

आवश्‍यक कपाशी बियाणे 
२०१७-१८---२०१८-१९
जळगाव जिल्हा 
२२ लाख पाकिटे---१६ लाख पाकिटे
धुळे व नंदुरबार 
१४ लाख पाकिटे---नऊ लाख पाकिटे

जळगाव जिल्ह्यातील क्षेत्र
२०१७-१८---२०१८-१९
चार लाख ७५ हजार---साडेतीन लाख

धुळे व नंदुरबारमधील क्षेत्र
२०१७-१८---२०१८-१९
तीन लाख २५ हजार---दोन लाख

खते व कपाशी बियाणे बाजारातील उलाढाल (अंदाजित)
२०१७-१८---२०१८-१९
२७ कोटी---१९ ते २० कोटी

प्रतिक्रिया
काही खासगी साखर कारखाने सुरू होत आहेत. ऊस तोडणीबाबतच्या अडचणी कमी झाल्या आहेत. तसेच ऊस पिकात केळी, कपाशीसारखी जोखीम नाही. गारपीट, वादळाचा उसाला फटका अतिशय कमी बसतो. म्हणून उसाकडे शेतकरी वळतील, असे चित्र आहे. 
- नाना भाऊसिंग पाटील, शेतकरी, पिंप्री खुर्द, (जि. जळगाव)

कपाशीवर एवढी रोगराई आली की खर्च अधिक झाला. उत्पन्न अतिशय कमी आल्याने शेतकरी कर्जबाजारीच राहील, अशी स्थिती आहे. कपाशी खानदेशचे प्रमुख पीक असले तरी पुढील वर्षी क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटेल, असे वाटते. कारण तापीकाठावर भाजीपाला, ऊस याकडे शेतकरी वळले आहेत. 
- प्रकाश पाटील, शेती विषयाचे अभ्यासक, धुळे

 

  

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...