agriculture news in Marathi, cotton industry in trouble due to taxes, Maharashtra | Agrowon

करांमुळे कापूस उद्योग अडचणीत
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

जळगाव  ः यंदा गुलाबी बोंडअळीचा फटका कापूस उत्पादकांना बसल्याने उत्पादनात ४० ते ५० लाख गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) घट निश्‍चित होणार आहे. यातच वस्तू व सेवाकर, रिव्हर्स कॅल्क्‍युलेशन मॅकेनिझम (आरसीएम) व मार्केट सेसमुळे कापूस प्रक्रिया उद्योगाला फटका बसत असून, बाहेरच्या देशातील खरेदीदारांकडून प्रतिसाद कमी होत आहे. निर्यातीवर परिणाम झाला असून, करांची समस्या सोडविण्यासह खासगी कापड उद्योग आणि जिनिंग उद्योगाला विजेच्या दरात युनिटमागे दोन रुपये सवलत मिळण्यासंबंधी केंद्र सरकारला साकडे घातले जाईल, असा निर्धार कॉटन असोसिएशनच्या बैठकीत करण्यात आला.

जळगाव  ः यंदा गुलाबी बोंडअळीचा फटका कापूस उत्पादकांना बसल्याने उत्पादनात ४० ते ५० लाख गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) घट निश्‍चित होणार आहे. यातच वस्तू व सेवाकर, रिव्हर्स कॅल्क्‍युलेशन मॅकेनिझम (आरसीएम) व मार्केट सेसमुळे कापूस प्रक्रिया उद्योगाला फटका बसत असून, बाहेरच्या देशातील खरेदीदारांकडून प्रतिसाद कमी होत आहे. निर्यातीवर परिणाम झाला असून, करांची समस्या सोडविण्यासह खासगी कापड उद्योग आणि जिनिंग उद्योगाला विजेच्या दरात युनिटमागे दोन रुपये सवलत मिळण्यासंबंधी केंद्र सरकारला साकडे घातले जाईल, असा निर्धार कॉटन असोसिएशनच्या बैठकीत करण्यात आला.

 मुंबई येथील हार्बर रेल्वे मार्गावरील कॉटन ग्रीन रेल्वे स्टेशननजीकच्या कॉटन बिल्डिंगमध्ये नुकतीच ही बैठक झाली. त्यात असोसिएशनचे अध्यक्ष अतुल गणात्रा, सदस्य अनिल सोमाणी (जळगाव), गोपाल अग्रवाल आदी सहभागी झाले. 
ऑक्‍टोबरमध्ये कापूस बाजार ७० सेंटवर आला होता. तो डिसेंबरमध्ये ८४ सेंटवर पोचला. आजघडीला हाच बाजार ७६ सेंटवर आला असून, रूई, सूत, कापड उद्योग वित्तीय संकटातून जात आहे. वस्तू व सेवाकरातील आरसीएम प्रणालीमुळे कापूस उद्योगातील व्हॅल्यू चेन बाधीत झाली आहे.

बाहेरच्या देशातील खरेदीदारांना भारतीय कापड, सूत किंवा रूई बांगलादेश, पाकिस्तानच्या तुलनेत महागात पडत असल्याने निर्यातीवर परिणाम झाला आहे. सरकारने रूई, सुताच्या निर्यातीवरील प्रत्येकी दीड व तीन टक्के अनुदान (इन्सेटिव्ह) रद्द केले आहे. दुसऱ्या बाजूला कापूस खरेदीदारांना एक टक्के मार्केट सेस द्यावा लागतो. सहकारी संस्थांना विजेच्या दरात जशी सूट दिली आहे, तशी सूट जिनर्स व खासगी कापड उद्योगांना दिली जावी. जिनर्सना कापूस खरेदी करताना पाच टक्के वस्तू व सेवाकर द्यावा लागतो. सहा, सहा महिने परतावा (रिफंड) मिळत नाही. 

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...