agriculture news in Marathi, cotton is a loss bearer crop this year, Maharashtra | Agrowon

हेमंत देशमुख यांना कापूस यंदा ठरले नुकसानीचे पीक
गोपाल हागे
बुधवार, 20 डिसेंबर 2017

अकोला ः या हंगामात बोंड अळीचा परिणाम इतका भीषण झाला, की असंख्य शेतकऱ्यांनी उभे पीक नांगरले. अनेकांना मशागतीचा खर्चही मिळू शकलेला नाही. काही शेतकऱ्यांना लागवड खर्च निघाला; मात्र या पिकाने पुरती निराशा केली.

मालेगाव तालुक्यातील डोंगरकिन्ही येथे प्रयोगशील तथा संपूर्ण अाॅटोमायजेशन पद्धतीने शेती करणारे शेतकरी हेमंत देशमुख यांनी चार एकरात लागवड केलेल्या कपाशीवर नुकताच ट्रॅक्टर फिरवला अाहे. त्यांना एकरी अवघी सव्वाचार क्विंटल उत्पादकता अाली असून, खर्च वजा जाता नाममात्र पैसे हातात उरले अाहेत.

अकोला ः या हंगामात बोंड अळीचा परिणाम इतका भीषण झाला, की असंख्य शेतकऱ्यांनी उभे पीक नांगरले. अनेकांना मशागतीचा खर्चही मिळू शकलेला नाही. काही शेतकऱ्यांना लागवड खर्च निघाला; मात्र या पिकाने पुरती निराशा केली.

मालेगाव तालुक्यातील डोंगरकिन्ही येथे प्रयोगशील तथा संपूर्ण अाॅटोमायजेशन पद्धतीने शेती करणारे शेतकरी हेमंत देशमुख यांनी चार एकरात लागवड केलेल्या कपाशीवर नुकताच ट्रॅक्टर फिरवला अाहे. त्यांना एकरी अवघी सव्वाचार क्विंटल उत्पादकता अाली असून, खर्च वजा जाता नाममात्र पैसे हातात उरले अाहेत.

श्री. देशमुख हे अाधुनिक पद्धतीने शेती करणारे शेतकरी म्हणून अोळखले जातात. त्यांनी चार एकरांत बीटी कपाशीची लागवड २८ जूनला केली होती. दरवर्षी त्यांना किमान एकरी १७ क्विंटलपेक्षा अधिक कापूस व्हायचे. याही वर्षी सुरवातीच्या काळात पीक चांगले असल्याने एवढीच खात्री होती. परंतु बोंड अळीचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत गेला अाणि संपूर्ण पीक अळीने फस्त केले.

झाडांवर बोंड्या दिसूनही त्यातून कापूस निघत नव्हता. वेचाई करायला मजूर नाकारत होते इतके हे काम किचकट झाले होते. वेचाई अाठ रुपये किलाे दराने त्यांनी चुकविली. पीक येण्याची कुठलीही शक्यता दिसत नसल्याने देशमुख यांनी गेल्या अाठवड्यात चारही एकरांत ट्रॅक्टर फिरवून पीक नष्ट केले.

 इतका वाईट अनुभव पहिल्यांदा अाल्याचे ते म्हणाले. उच्चशिक्षित असलेले देशमुख यांनी वेळच्या वेळी अाधुनिक पद्धतीने खत नियोजन, कीडनाशकांची फवारणी घेतली. परंतु पिकाची अवस्था हाताबाहेर गेली अाणि पीक काढण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता असे त्यांनी सांगितले.

चार एकर कापूस पिकाचा ताळेबंद

खर्च :  

 शेत तयार करणे  ४५००
 बियाणे       ४८००
 लागवड मजुरी  २०००
 डवरणी  २०००
 रासायनिक खते  १५०००
 फवारणी  १००००
 निंदण  ५०००
 वेचाई     (८ रुपये प्रतिकिलो)  १२८०० 
 ठिबक मजुरी  १०००
 शेवटची नांगरटी    २०००
 एकूण खर्च     ५९,१००

 
उत्पन्न :  

कापूस उत्पादन १६ क्विंटल १५ किलो
मिळालेला भाव ४४०० रुपये क्विंटल
एकूण उत्पन्न  ७१०६० रुपये

 
राहिलेली शिल्लक रक्कम

एकूण खर्च      ५९,१००
एकूण उत्पन्न    ७१०६०
खर्चवजा जाता शिल्लक  ११९६०
एकरी शिल्लक २९९०

 

(टीप ः खर्चामध्ये वैयक्तिक पीक निगराणी आणि जमिनीचे भाडे धरले नाही.)

    

    
   

    

इतर अॅग्रो विशेष
कोरडवाहू शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची...सोलापूर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत...
बीजी - ३ चे घोडे अडले कुठे?आगामी हंगाम धोक्‍याचा सन २०१७ च्या खरीप हंगामात...
आव्हान पाणी मुरविण्याचेठिबक सिंचन अनुदानासाठी यावर्षी विक्रमी निधी...
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...
देशात खालावत आहे जमिनीचे आरोग्यनागपूर : खोल मशागत, नियंत्रित खत व्यवस्थापनाला...
बोंड अळी भरपाईसाठी सुनावणी आजपासूनपुणे : राज्यात शेंदरी बोंड अळीमुळे...
तूर खरेदी अडकली नोंदणीतचलातूर ः तेलंगणा, कर्नाटक राज्याने हमीभावाप्रमाणे...
कष्ट, अभ्यासातून जोपासलेली देवरेंची...नाशिक जिल्ह्यातील नाशिक सटाणा तालुक्याचा परिसर...
लसीकरणाअभावी दाेन काेटी पशुधनाचे...पुणे ः सुमारे ३० काेटींची निविदा मिळविण्यासाठी...
सिद्धेश्‍वर यात्रेतील बाजारात खिलार बैल...सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धेश्‍वर...
जिरायती शेती विकासातून थांबेल स्थलांतरमराठवाडा आणि विदर्भ विभागातील जिरायती शेतकरी...
संभ्रम दूर करामागील खरीप हंगामात चांगल्या पाऊसमानाच्या...
मुद्रा योजनेच्या १० लाखांपर्यंतच्या...कोल्हापूर : तरुणांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर...
रब्बीचा ६१.८ दशलक्ष हेक्टरवर पेरानवी दिल्ली ः भारतातील रब्बी क्षेत्रात यंदा गेल्या...
प्रशिक्षणांना दांड्या मारणाऱ्या...अकोला : अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता...
ठिबक अनुदानासाठी ७६४ कोटींचा निधीपुणे: राज्यात ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात ४३ टक्‍के जमीन चुनखडऔरंगाबाद : मराठवाड्यातील जमिनीचा पोत दिवसेंदिवस...
दशकातील सर्वांत मोठ्या कापूस आयातीचे...जळगाव ः महाराष्ट्रासह काही प्रमुख कापूस उत्पादक...