| Agrowon

भाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात कापसावरील गुलाबी बोंड अळीचा ल्यूर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे यासाठी ल्यूरच्या (नर पतंगांना आकर्षित करणारे कामगंध रसायन) पाकिटावर स्किटर लावत बोंड अळी नियंत्रणाकामी त्यांचा पुरवठा करण्यात आला. थेट मुदतबाह्य ल्यूर पुरविण्यात आल्याचा धक्‍कादायक खुलासाही चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे.

चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे यासाठी ल्यूरच्या (नर पतंगांना आकर्षित करणारे कामगंध रसायन) पाकिटावर स्किटर लावत बोंड अळी नियंत्रणाकामी त्यांचा पुरवठा करण्यात आला. थेट मुदतबाह्य ल्यूर पुरविण्यात आल्याचा धक्‍कादायक खुलासाही चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे.

या वर्षी कापूस पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे त्याच्या नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांवर कृषी विभागाने भर दिला आहे. परंतू कृषी विभागाच्या या प्रयत्नांना खीळ घालण्याचे काम कृषी मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या कृषी औद्योगीक विकास मंडळाकडून होत असल्याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १ लाख ८४ हजार २५५ हेक्‍टर क्षेत्रावर कापसाची लागवड होते.

तेलंगणा सीमेलगत असलेल्या या भागात गेल्या हंगामात सर्वाधिक क्षेत्रावर प्रतिबंधित एच.टी. (हर्बीसाईड टॉलरंट) बियाणे लागवड झाली होती, असे सांगण्यात येते. या वर्षी पुन्हा गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये याकरीता कृषी विभागाने राज्यात सुरू असलेल्या प्रयत्नांच्या धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्यातदेखील उपाययोजना राबविणे सुुरू केले. परंतू या प्रयत्नांना पहिल्याच टप्प्यात खीळ घालण्यात आल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

दरम्यान, लूरचा पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. 

पाकिटावर मुदत २०११ मध्ये संपत असल्याचा उल्लेख 
महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास मंडळामार्फत (एमएआयडीसी) चंद्रपूर जिल्ह्यात फेरोमोन ट्रॅप्सचा ७० रुपये दराने पुरवठा करण्यात आला आहे. यात वापरण्यात आलेल्या ल्यूरच्या पाकिटांवर स्टिकर लावण्यात आले आहे. हे स्टिकर काढल्यानंतर त्याखालील मूळ पाकिटावर भात खोडकिडीच्या पतंगासाठीचे लूर असल्याचा उल्लेख आहे. मागील बाजूस देखील स्टिकर लावण्यात आले असून, त्यावर उत्पादन तारीख २०१० आणि मुदत संपण्याचा कालावधी २०११ असा उल्लेख आहे.

इतर अॅग्रो विशेष
चांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...
धुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणारमुंबई : साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप...
राज्याच्या तापमानात वाढपुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस थांबला...
मिरचीच्या आगारात सुधारित तंत्राचा वापरअौरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काही तालुके मिरचीचे...
देशात तब्बल ६८ टक्के दुधात होते भेसळपुणे : देशात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८...
राज्य बँकेवरील जिल्हा बँकांचे...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक...
फुलशेतीने दिली आर्थिक साथहिंगोली जिल्ह्यातील तपोवन (ता. औंढा नागनाथ)...
जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...
प्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...
ऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई :  राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...
मॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...
सेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...
‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...
महसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...