agriculture news in marathi, cotton market stable due to dollar market up, Maharashtra | Agrowon

डॉलर वधारल्याने कापूस बाजार सावरला
चंद्रकांत जाधव
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

तीन आठवड्यांपूर्वी अमेरिकन कापूस वायदा बाजारात थोडी घसरण झाली. परंतु, डॉलरचे दर रुपयाच्या तुलनेत उच्चांकी पातळीवर गेल्याने भारतीय कापूस बाजार सावरला आहे. सद्यःस्थितीत लांब धाग्याच्या (२९ मि.मी.) कापसाचे दर ५८०० रुपये असून, नूवीन व डीसीएच प्रकारच्या कापसाला यंदाचे सर्वाधिक दर सध्या मिळत आहेत. कारण आयात मिलांना परवडत नसल्याची स्थिती आहे. 
- अनिल सोमाणी, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया

जळगाव ः रुपयाच्या तुलनेत डॉलरचे वधारते दर, न परवडणारी आयात व निर्यातीसंबंधीचे वाढते सौदे यामुळे देशांतर्गत बाजारात ३५ ते ३७ मिलिमीटर लांब धाग्याच्या रुईचे दर उच्चांकी पातळीवर पोचले असून, किमान ६१ हजार रुपये खंडी (३५६ किलो रुई) असे दर ३५ व ३७ मिलिमीटर लांब धाग्याचा कापूस म्हणून ओळख असलेल्या नूवीन व डीसीएच प्रकारच्या रुईला देशांतर्गत बाजारात मिळत आहेत. 
 

रुपयाचे दर डॉलरच्या तुलनेत नीचांकी पातळीवर पोचल्याने २९ मिलिमीटर लांब धाग्याच्या रुईचे दर सात टक्‍क्‍यांनी वधारून ते ४८ हजार रुपये प्रतिखंडी, असे झाले आहेत. तीन आठवड्यांपूर्वी अमेरिकन कापूस वायदा बाजार ९४ सेंटवरून ८७ सेंटवर खाली आला. मागील आठवड्यात अमेरिकन बाजार ८२ सेंटवर स्थिरावला. चीन व अमेरिका यांच्यातील व्यापार युद्धामुळे चलन बाजारावर परिणाम दिसून येताच कापूस बाजारही घसरू लागला.

डॉलर मात्र वधारून तो ७०.२१ रुपये, अशा दरांवर पोचला. यामुळे ४७५०० रुपये खंडीपर्यंत खाली आलेले रुईचे दर ४८००० रुपयांपर्यंत पोचले आहेत. निर्यातीसंबंधी नफ्याचे सौदे होत आहेत, परंतु भारतात अल्प प्रमाणात पिकणाऱ्या लांब धाग्याच्या (३५ मिलिमीटर) पिमा व गिझा प्रकारच्या कापसाची आयात देशांतर्गत मिलांना परवडत नाही. 

ऑस्ट्रेलिया, अमेरिका व तुर्की येथून पिमा व गिझा प्रकारच्या गाठींची आयात करायची असल्यास प्रतिखंडी ७१ ते ७२ हजार रुपये दर पडत आहे. पहिल्या दर्जाचे सूत निर्मिती व ब्रॅण्डेड कपडे निर्मितीसाठी या लांब धाग्याच्या कापसाची गरज मिलांना काही प्रमाणात असते. ही गरज देशांतर्गत बाजारात पूर्ण करणे शक्‍य असल्याने देशांतर्गत बाजारात त्यासंबंधीचे सौदे सुरू असून, त्यांना यंदा उच्चांकी ६१ हजार रुपये प्रतिखंडी, असा दर आहे. 

नूवीन प्रकारचा कापूस किंवा रुई फक्त तामिळनाडू व ओरिसालगत उपलब्ध होत आहे. या भागात सुमारे १० हजार गाठींचे (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन यंदा झाले आहे. हा कापूस ३७ मिलिमीटर लांबीचा असून, पिमा व गिझासारखाच दर्जा त्यात मिळत आहे. तर डीसीएच प्रकारचा कापूस किंवा रुई मध्य प्रदेशातील रतलाम व परिसर आणि महाराष्ट्रातील सिल्लोड, कन्नड (जि. औरंगाबाद) भागात उपलब्ध होत आहे.

डीसीएचचे यंदा सुमारे दीड लाख गाठींचे उत्पादन झाले आहे. त्याला चांगले दर मिळत असल्याने यंदा लागवड क्षेत्र संबंधित भागात वाढले आहे. अमेरिकन वायदा बाजारात सुताच्या दरांबाबत थोडी पडझड झाली. परिणामी देशातही उत्तम दर्जाच्या सुताचे दर थोडे दबावात आल्याची माहिती मिळाली. 

कापसाला सध्या ५८०० रुपये दर
दर्जेदार कापसाला सध्या ५८०० रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत. केंद्राने लांब धाग्याच्या कापसाचे दर ५४५० रुपये प्रतिक्विंटल केल्याने दर कमी होणार नाहीत. महाराष्ट्र, पंजाब, हरयाणात या महिन्याच्या अखेरिस वेचणी सुरू होईल. यंदा गुलाबी बोंड अळीचे प्रमाण कमी दिसत आहे, असे जाणकारांनी सांगितले. 

इतर अॅग्रो विशेष
जलदारिद्र्य निर्देशांकातही आपली पिछाडीचएखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करणार...
पांढऱ्या सोन्याची काळी कहाणीजागतिक पातळीवर कापसाखाली असलेल्या क्षेत्राच्या एक...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...
जमिनीच्या आरोग्य कार्डाची उपयुक्तताभारतातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचे...
संत्रा झाडे वाळण्याची कारणे जाणून करा...विविध संत्रा बागांमध्ये उन्हाळ्यात आणि पावसाळा...
सोलापूर : ओसाड रानं अन्‌ जनावरांची पोटं...सोलापूर ः टॅंकरच्या पाण्यासाठी गावोगावी...
कान्हूरपठार, करंदी परिसरात वादळी वा-...टाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः पारनेर...
वर्धा : रोजगारासाठी स्थलांतरामुळे गावं...वर्धा : शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून...
गावाेगावी पाण्याच्या टॅंकरकडं नजरानगरः तलाव, धरणं कोरडी पडली. कधीच आटल्या नाहीत,...
दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची माहिती...मुंबई : दुष्काळासंदर्भात उत्तर देण्यासाठी...
सत्तर कारखान्यांना बजावली 'आरआरसी'पुणे : राज्यातील १९५ साखर कारखान्यांकडून...
सेवानिवृत्तीनंतर शिक्षकाची शेतीत सेवा...आयुष्यभर नोकरी करताना अनेक गोष्टींचा त्याग करावा...
पतआराखड्याची वाट न बघता खरिपासाठी कर्जपुणे : खरीप पीक कर्जवाटप नियोजनात मुख्य भूमिका...
गिलक्‍याने दिले अर्थकारणाला बळबाजारपेठेची गरज ओळखून कठोरा (ता. जि. जळगाव) येथील...
जरंडीत ‘एक गाव, एक वाण’ योजना फसलीनागपूर ः कापसाचे एक गाव एक वाण लावण्याचा आदर्श...
उन्हाचा चटका कायम राहणार पुणे : विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी...
आया मौसम बदली कामार्च ते मे हे तीन महिने शासकीय अधिकारी-...