agriculture news in Marathi, cotton picker will change cotton planting Technic in India, Maharashtra | Agrowon

कॉटन पिकर बदलवणार देशाच्या कपाशीचे लागवडतंत्र
टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

पुणे: मजुरांअभावी कापूस वेचणीसाठी देशाच्या कापूस शेतीत तयार झालेल्या सर्वात मोठ्या समस्येवर शक्तिशाली ''कॉटन पिकर'' उपाय शोधण्यात आला आहे. मात्र, या कॉटन पिकरला शेतात हवे तसे काम करता येण्यासाठी थेट कापूस लागवड तंत्रातच बदल घडवून आणण्यासाठी कृषी अवजार कंपन्या चिकाटीने प्रयत्न करीत आहेत. 

पुणे: मजुरांअभावी कापूस वेचणीसाठी देशाच्या कापूस शेतीत तयार झालेल्या सर्वात मोठ्या समस्येवर शक्तिशाली ''कॉटन पिकर'' उपाय शोधण्यात आला आहे. मात्र, या कॉटन पिकरला शेतात हवे तसे काम करता येण्यासाठी थेट कापूस लागवड तंत्रातच बदल घडवून आणण्यासाठी कृषी अवजार कंपन्या चिकाटीने प्रयत्न करीत आहेत. 

देशात अंदाजे १०० लाख हेक्टरपेक्षा जास्त कापूस पेरा केला जात असून, त्यातील कापूस वेचणीसाठी स्थानिक मजुरांचा वापर केला जातो. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून मजुरांची टंचाई आणि मजुरीचे वाढते दर यामुळे कापूस उत्पादक शेतकरी हैराण झालेले आहेत. त्यासाठी ऊसशेतीत आलेल्या ''केन हार्वेस्टर''प्रमाणेच कपाशीत ''कॉटन पिकर'' आणण्याचा कंपन्यांचा प्रयत्न आहे. 

कापूस उत्पादक पट्टयांमधून दर हंगामात सरासरी ३३० लाख ते ३५० लाख गाठींपर्यंत कापूस वेचणी केली जाते.  मजुरांअभावी कापूस शेतीत मोठी समस्या तयार झालेली आहे. यामुळे गहू-धानात वापरल्या जाणाऱ्या हार्वेस्टरप्रमाणेच मजुरांऐवजी थेट यंत्राच्या सहायाने पर्याय पुढे येण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात ७५, ९०, ११० अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरला या यंत्राची जोडणी केली जाणार आहे. 

''कापूस वेचणी करण्याकडे कृषीअवजार उद्योगाला यंत्र निर्मितीसाठी वाव आहे. त्यासाठी एका आघाडीच्या विदेशी कंपनीने कापूस वेचणी करणारे कॉटन पिकरची निर्मिती केली आहे. मात्र, मुख्य मुद्दा आहे तो भारतीय कापूस लागवड तंत्राचा. त्यामुळे या कंपनीने शेतकऱ्यांना केवळ कापूस वेचणीचे कॉटन पिकर नव्हे, तर वेगळे वाण, त्यासाठी लागणारी पीकसंरक्षण साधने आणि पानगळीचे रसायनदेखील कसे पुरवता येईल यासाठी आराखडे तयार केले आहेत,’’ अशी माहिती एका अभ्यासकाने दिली.  

कॉटन पिकर यंत्राला वेचणी सुलभपणे करण्यासाठी एकाच वेळी बोंड असलेली झाडे हवी आहेत. भारतात सध्या अस्तित्वात असलेल्या वाणाला एकाच वेळी बोंड येत नाहीत. याशिवाय दुसरा खोडवा म्हणजे फरदडचीदेखील वेचणी करावी लागते. ही समस्या नव्या वाणातून सोडविली जाणार आहे. 

कपाशीत पानगळीसाठी रसायनांच्या चाचण्या
भारतात या नव्या वाणाला कपाशीची बोंडे एकसारखी व एकाच वेळी आल्यानंतर पुढे यंत्राद्वारे कापणीपूर्वी पानगळ करण्यासाठी रसायनांच्या चाचण्यादेखील घेतल्या जात आहेत. कॉटन पिकर यंत्रात कपाशीची पाने न जाता फक्त बोंडे जावीत, असा प्रयत्न संशोधकांचा चालू आहे. अर्थात, संशोधनाचा तपशील अजून कंपनीने जाहीर केलेला नाही. या नव्या कॉटन पिकरची किंमत २५ ते ३० लाख रुपयांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.  
 

इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत व्याज माफ;...बारामती, पुणे ः "छत्रपती शिवाजी महाराज...
अवजारांची गुणवत्ता हाच बनलाय ब्रॅंडगिरणारे (जि. नाशिक) गावातील पिंकी सुधाकर पवार...
‘तेर` करतेय पर्यावरण, शिक्षण अन्‌ सौर...पुणे येथील ‘तेर पॉलिसी सेंटर` या स्वयंसेवी...
'कृषी उद्योग'मधील वादग्रस्त सूर्यगण...पुणे : महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळातील...
‘फॉस्फोनिक ॲसिड’च्या आढळाने ‘सॅंपल फेल’...पुणे : डाळिंब पिकात केवळ सातच लेबल क्लेम...
बोंड अळी, धान नुकसानग्रस्तांना मदतीसाठी...पुणे : बाेंड अळीच्या प्रादुर्भावाने नुकसान...
बेदाण्याचे यंदा तीस टक्केच उत्पादनसांगली : राज्यात दरवर्षी सुमारे २ लाख टन...
हमीभावाच्या मुद्द्यावरून गैरसमज पसरवले...नवी दिल्ली : उत्पादन खर्चावर ५० टक्के हमीभाव...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक...पुणे : राज्यावर अवकाळीचे ढग असल्याने पावसाचे सावट...
आसामी रेडकाचा ‘क्लोन’ यशस्वीहिस्सार, हरियाणा : येथील केंद्रीय म्हैस संशोधन...
राज्यात १५ लाख टन साखर उत्पादन वाढलेकोल्हापूर : राज्यात सुरू हंगामात यंदा अंदाजपेक्षा...
प्लॅस्टिक, थर्माकोलच्या उत्पादनांवर बंदीमुंबई : राज्यात प्लॅस्टिक; तसेच थर्माकोलपासून...
जिवाशी खेळ थांबवाराज्यातील भेसळयुक्त दूधविक्रीचा प्रश्न चालू...
अवकाशाला गवसणी घालणारा शास्त्रज्ञस्टीफन हॉकिंग २००१च्या नवीन वर्षाच्या ...
कृषिपंपांच्या वीजबिलाबाबतचे 'महावितरण'...मुंबई : कृषिपंपांसाठी येणाऱ्या वीजबिलाने...
ढगाळ हवामानासह काही ठिकाणी पावसाची शक्‍...महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल तर अरबी...
भारतातील दहा कोटी जनता पितेय दूषित पाणीनवी दिल्ली : रंग, गंधहिन द्रव्य म्हणजेच पाणी...
ढगाळ हवामान, आजही पावसाची शक्यतापुणे : राज्यात सध्या सर्वदूर ढगाळ हवामानासह तुरळक...
पाडव्याच्या वायद्यात शेतमालाच्या भावाचा...लातूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने...
निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी अवघे...पुणे : सातत्याने होणारे हवामान बदल, वाढता कीड-...