agriculture news in marathi, cotton picking costs 25 percent, ahmednagar, Maharashtra | Agrowon

कापसाच्या वेचणीवरच पंचवीस टक्के खर्च
सूर्यकांत नेटके
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

नगर : गरजेच्या वेळी पाऊस झाला नाही अन्‌ वेचणीला सुरवात झाल्यावर शेवटच्या महिन्यात झालेल्या पावसाने हाती आलेल्या कापूस पिकाचे नुकसान झाले. अशा दुहेरी संकटात सध्या राज्यातील कापूस उत्पादक सापडला आहे. परतीचा पाऊस गायब झाल्यावर कापूस वेचणीची लगबग सुरू आहे. मात्र सध्या मजुराच्या टंचाईचा गंभीर परिणाम दिसून येत आहे. वेचणीसाठी कापसाला प्रतिकिलोला तब्बल दहा ते बारा रुपये मजुरांना द्यावे लागत आहे.

नगर : गरजेच्या वेळी पाऊस झाला नाही अन्‌ वेचणीला सुरवात झाल्यावर शेवटच्या महिन्यात झालेल्या पावसाने हाती आलेल्या कापूस पिकाचे नुकसान झाले. अशा दुहेरी संकटात सध्या राज्यातील कापूस उत्पादक सापडला आहे. परतीचा पाऊस गायब झाल्यावर कापूस वेचणीची लगबग सुरू आहे. मात्र सध्या मजुराच्या टंचाईचा गंभीर परिणाम दिसून येत आहे. वेचणीसाठी कापसाला प्रतिकिलोला तब्बल दहा ते बारा रुपये मजुरांना द्यावे लागत आहे.

बाजारात कापसाला चार हजार ते चार हजार दोनशे रुपये दर मिळत असल्याने सध्याच्या दराचा विचार करता तब्बल पंचवीस टक्के रक्कम फक्त वेचणीवर खर्च करण्याची नामुष्की कापूस उत्पादकांवर आली आहे. विशेष म्हणजे कापूस वेचणीसाठी आतापर्यंतचा हा सर्वाधिक दर आहे.

राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश, नागपूर भागात कापसाचे उत्पादन घेतले जायचे. अलीकडच्या दहा वर्षांत उसाचा पट्टा असलेल्या नगर, नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर भागातही कापसाचे उत्पादन घेतले जात आहे. नगर जिल्ह्यामध्ये तब्बल सव्वा लाख हेक्‍टर क्षेत्रावर कापसाचे उत्पादन घेतले जाते. गेल्या सहा वर्षांत मात्र टंचाई आणि दुष्काळी स्थितीचा विचार करता कापसाचे क्षेत्र वाढत असले तरी उत्पादनात मात्र घट होत आहे. 

दरम्यान उन्हाचा चटका वाढला असून कापसाची मोठ्या प्रमाणात फूट झाली. सध्या कापसाच्या वेचणीसाठी मजुरांची टंचाई भासत आहे. त्यामुळे कापूस वेचणीसाठी दहा ते बारा रुपये प्रतिकिलोला दर द्यावा लागत आहे. शिवाय मजुरांच्या जाण्या-येण्याचाही खर्च उत्पादकांना करावा लागत आहे. बाजारात मात्र चार हजार ते चार हजार दोनशे रुपयांपेक्षा अधिक कापसाला दर नाही. त्यामुळे यंदा क्षेत्र वाढले तरी दरामुळे कापसाची शेतीही आतबट्ट्याचीच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यासह मराठवाड्यात खासगी व्यापाऱ्यांकडून चार हजार ते चार हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटलने कापसाची खरेदी सुरू झाली आहे. हमीभावाने खरेदी करण्यासाठी ''खरेदी केंद्र'' सुरू करणार असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र अजूनही कोठेच सरकारी खरेदी केंद्रे सुरू झाली नाहीत. 

इतर ताज्या घडामोडी
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...